शेतकऱ्यांना मोफत धान्य
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्र्यरेषेखालील, परंतु डीबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने पाच किलो मोफत धान्य मिळणार आहे. यामध्ये माणशी तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू या प्रमाणात धान्य दिले जाणार आहे.
नर्मदा-तापी वळण योजनेला मंजुरी
नंदूरबार जिल्ह्यातील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली. या योजनेत सहा वळण बंधाऱ्यांचे नियोजन आहे. यामाध्यमातून परिसरातील सुमारे २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून ११.५० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.
आर्थिक फसवणुकीवर जलद कारवाई
आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया जलद होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन करण्याबाबत आणि नव्वद दिवसांच्या आत प्रकरण निकाली काढण्याची कालमर्यादा ठरवण्याबाबत महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमानमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली.
Pune Shivajinagar Court Firing : पुण्यात शिवाजी नगर येथे भरदिवसा गोळीबाराची घटना; गोळीबारानंतर कोयत्याने एकावर हल्ला
Pune Shivajinagar Court Firing : पुण्यात शिवाजी नगर येथे कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबाराची घडना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाबाहेर गोळीबार करत ...
महसूल न्यायालयांसाठी नवी प्रणाली
महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजासाठी महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी एक जिल्हा, एक अपील ही तरतूद लागू होणार आहे. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली.
विद्यार्थ्यांना भत्ता वाढ
आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुधारित दराने भत्ता मिळणार आहे. भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्यात आली आहे.
शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सुविधा
शालार्थ प्रणालीत समाविष्ट असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरबीआयकडे नोंदणीकृत संस्थांमार्फत ही सुविधा मिळणार आहे.
मुद्रांक अधिनियमानत सुधारणा
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम ३२ (ब) आणि ५३ (१अ) मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. याबाबतचे विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. या सुधारणेमुळे अभिनिर्णय फी आणि अपील फी यांच्या दरात सुसूत्रता येणार आहे.
Flipkart CEO : फ्लिपकार्टचे CEO कल्याण कृष्णमूर्ती पद सोडणार; 11 वर्षांच्या कार्यकाळात कंपनीची पाचपट वाढ
ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कल्याण कृष्णमूर्ती आपल्या पदाचा कार्यकाळ संपवत आहेत. कंपनीने बुधवारी ...
विद्यापीठ अधिनियमानत बदल
कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक अधिनियम १९९७ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिनियम १९८९ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. कुलसचिव नियुक्ती, परिनियम, वित्त व लेखा समिती, इमारत बांधकाम समिती, वार्षिक अहवाल व लेखे यासंदर्भातील परिभाषांमध्ये एकसमानता आणण्यासाठी ही सुधारणा केली जाणार आहे.
खाजगी अनुदानित शाळांसाठी नवा कायदा
खाजगी अनुदानित शाळांच्या विनियमनासाठी सर्वसमावेशक कायदा आणला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र खाजगी अनुदानित शाळा (विनियमन) विधेयक, २०२६ च्या प्रारूपास मंजुरी देण्यात आली. हे विधेयक विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे.
माथाडी आणि सुरक्षा रक्षक कायद्यात सुधारणा
महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली.
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील आणखी दोन स्थानकं खुली; कधीपासून प्रवास करता येणार?
पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील नोकरदारांना वाहतूक कोंडीतून मेट्रोच्या पिंक मार्गिकेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ...
अॅक्युपंक्चर वगळणार
राष्ट्रीय सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यवसाय आयोग अधिनियम २०२१ मधून अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धती वगळण्यात येणार आहे. याबाबतच्या आवश्यक सुधारणा करण्याच्या विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी देण्यात आली.
ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग
शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयामधील पूर्ण वेळ ग्रंथपालाप्रमाणेच आता खाजगी अनुदानित आयुर्वेद व खाजगी अनुदानित युनानी महाविद्यालयातील ग्रंथपालांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे.
इतर निर्णय
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ मधील तरतुदीसाठीच्या सुधारणेस मान्यता देण्यात आली. तसेच नागपूर जिल्ह्यातील मौदा नगर पंचायतीला शासकीय जमीन देण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे नगर पंचायतीसाठी प्रशासकीय इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.