'कमळी'च्या ऋषीची नवी आवड! निखिल दामलेने 2026 मध्ये वाचनातून जोपासली इतिहासाची गोडी

सरत्या वर्षातील अनुभव, शिकवण आणि आठवणी सोबत घेऊन नव्या वर्षात काही नवीन गोष्टी करण्याचा संकल्प केला जातो. झी मराठीवरील 'कमळी' या मालिकेत ‘ऋषी ’ची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल दामले याच्यासाठीही 2026 हे वर्ष एका चांगल्या सवयीची सुरुवात करणारे ठरले.

Nikhil Damle: सरत्या वर्षातील अनुभव, शिकवण आणि आठवणी सोबत घेऊन नव्या वर्षात काही नवीन गोष्टी करण्याचा संकल्प केला जातो. झी मराठीवरील 'कमळी' या मालिकेत ‘ऋषी ’ची भूमिका साकारणारा अभिनेता निखिल दामले याच्यासाठीही 2026 हे वर्ष एका चांगल्या सवयीची सुरुवात करणारे ठरले. वर्षभरातील चांगलया सवयी आणि 2027 मधील संकल्पना याविषयी निखिलने भाष्य केले आहे. 2026 मध्ये वाचनाची त्याला गोडी वाढली, मराठा इतिहासाचा सखोल अभ्यास केला, असे खास वर्षभरातील अनुभव ऋषीने सांगितले आहेत.





अभिनेता निखिल दामले काय म्हणाला?


आपल्या 2026 च्या चांगल्या सवयी आणि 2027 च्या संकल्पांबद्दल सांगताना निखिल दामले म्हणाला की, या वर्षात माझ्यात झालेला एक चांगला बदल म्हणजे मी आधीपेक्षा जास्त वाचन करू लागलो आहे. ही सवय मला आवडली असून, नवीन वर्षातही ती कायम ठेवायची आहे. या वर्षात मी 'छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे', 'तुम्हारी औकात क्या है' (पियूष मिश्रा), 'द करेज टू बी डिसलाइक्ड', 'द हिडन हिंदू' यांसारखी पुस्तके वाचली. तसेच 'सभासद बखर' आणि 'शिवभारत काव्य' यांचाही अभ्यास केला, असे निखिल म्हणाला.

पुढे बोलताना, मराठा इतिहासातील मूळ कागदपत्रे आणि अस्सल ऐतिहासिक संदर्भ वाचण्याची मला विशेष आवड निर्माण झाली आहे. यातून नेमके काय घडले होते आणि कोणत्या गोष्टी केवळ दंतकथा आहेत, हे समजून घेता येते. तसेच आपल्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांना अधिक जवळून समजून घेण्याची संधी मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मी माझे नवीन वर्ष कुटुंबीय किंवा मित्रांसोबत साजरे करणार आहे. सध्या तरी काही खास प्लॅन केलेला नाही. आगामी वर्षात मला अभिनयाच्या बाबतीत आणखी चांगले आणि आव्हानात्मक काम करायला आवडेल. प्रेक्षकांनी माझ्या कामावर यापुढेही असेच प्रेम करावे, ही अपेक्षा आहे. त्याचबरोबर माझ्या आरोग्याकडे आणि व्यायामाकडे अधिक लक्ष देऊन फिटनेसच्या बाबतीत नियमित राहण्याचा माझा संकल्प आहे, असे निखिलने सांगितले. 2026 मध्ये वाचनातून नवी आवड जोपासणाऱ्या निखिलसाठी 2027 हे वर्ष स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे घडवण्याचे असो. ही सदिच्छा!
Comments
Add Comment

Pooja Birari New Serial: ‘चुकीच्या गोष्टी खपवून घेत नाही!’ ‘येतेच आता मी नांदायला’मधील शिवानीबद्दल पूजा बिरारी काय म्हणाली?

Pooja Birari New Serial: झी मराठीवरील 'येतेच आता मी नांदायला' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या मालिकेत अभिनेत्री

रिलीजच्या 22 दिवस आधीच 60 कोटींचा धमाका! 'Avengers: Doomsday' च्या तिकीट विक्रीचा आकडा पाहून चाहते थक्क!

मार्व्हल स्टुडिओजच्या बहुप्रतिक्षित 'Avengers: Doomsday' चित्रपटाने देशभरात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.

प्रदर्शनापूर्वीच श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ चित्रपटाची चर्चा, 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये कोरलं नाव

पुणे: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘ईठा’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

‘किल्ला’मधील बालकलाकार अर्चित आता ‘झिम्मा 3’मध्ये! हेमंत ढोमे यांनी दिली खास संधी

Archit Deodhar: ‘किल्ला’सारख्या गाजलेल्या चित्रपटामधून बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अर्चित आता हेमंत ढोमे

7 वर्षांच्या मुलीची आई आणि अवघ्या काही महिन्यांचा अनुभव! प्यूर्टो रिकोच्या जेनिफर बॅरेटोने कसा रचला 75 व्या Miss Universe चा इतिहास?

सॅन जुआन : यंदाच्या 75 व्या Miss Universe सौंदर्यस्पर्धेचे विजेतेपद प्यूर्टो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हिने पटकावले आहे. 24 November

Fulwara Movie: वैदेही आणि प्रियदर्शिनीचा लावणी ठसका! ‘फुलवरा’मधील पहिली झलक समोर

Fulwara Movie: ‘नटरंग’नंतर तब्बल 16 वर्षांनी झी स्टुडिओज आणि रवी जाधव ही जोडी पुन्हा एकदा तमाशा आणि लावणीच्या विश्वात