‘किल्ला’मधील बालकलाकार अर्चित आता ‘झिम्मा 3’मध्ये! हेमंत ढोमे यांनी दिली खास संधी

‘किल्ला’सारख्या गाजलेल्या चित्रपटामधून बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अर्चित आता हेमंत ढोमे दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘झिम्मा ३’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड, कॅमेऱ्यासमोर उभं राहाण्याची ओढ आणि प्रत्येक नव्या भूमिकेतून काहीतरी वेगळं शिकण्याची उत्सुकता! याच आवडीतून अर्चित देवधरचा अभिनयप्रवास सुरू झाला.

Archit Deodhar: ‘किल्ला’सारख्या गाजलेल्या चित्रपटामधून बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अर्चित आता हेमंत ढोमे दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘झिम्मा ३’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड, कॅमेऱ्यासमोर उभं राहाण्याची ओढ आणि प्रत्येक नव्या भूमिकेतून काहीतरी वेगळं शिकण्याची उत्सुकता! याच आवडीतून अर्चित देवधरचा अभिनयप्रवास सुरू झाला. विशेष म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी अर्चितला पुन्हा एकदा मिळाली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट केवळ एक चित्रपट नसून त्याच्या अभिनयप्रवासातील एक खास टप्पा ठरणार आहे.

अर्चितने अगदी लहान वयापासून अभिनयाला सुरुवात केली. ‘किल्ला’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री अमृता सुभाष यांच्यासोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली. इतक्या कमी वयात एका आशयघन आणि गाजलेल्या चित्रपटाचा भाग होणं, थेट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर पोहोचणं, हा सगळाच अनुभव अर्चितला मोठी शिकवण देणारा ठरला. मात्र, अभिनयाबरोबरच त्याने शिक्षण आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षणासाठी चार वर्षे यूकेमध्ये असलेल्या अर्चितने युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅममधून ‘कलिनरी आर्ट्स अँड मॅनेजमेंट’ या विषयात फर्स्ट क्लाससह पदवी मिळवली. सध्या पुण्यात त्याची एक बेकरी आणि कॅफे आहे.






‘झिम्मा ३’मधील निवडीबद्दल अर्चित काय म्हणाला?


या चित्रपटात मला अभिनयाची संधी अनपेक्षितपणे मिळाली. हेमंत ढोमे यांनी अचानक इन्स्टाग्रामवर मेसेज करून त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं आहे असं सांगितलं. मी आणि साजिरी जोशी एकमेकांना फॉलो करतो. त्यामुळे साजिरीच्या फॉलोइंग लिस्टमधून त्यांनी माझं प्रोफाइल पाहिलं आणि मी ‘किल्ला’मध्ये काम केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मी मुंबईत येऊन त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, या व्यक्तिरेखेसाठी माझं ऑडिशनही झालं नाही. त्यांना हवी असलेली व्यक्तिरेखा मीच साकारू शकतो, हे त्यांच्या मनात आधीच ठरल होतं. शिक्षण पूर्ण करून पुण्यात माझे व्यवसाय सांभाळत असताना इतक्या वर्षांनंतर पुन्हा अशा प्रकारे अभिनयाची संधी मिळणं माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होतं. एकतर ‘झिम्मा 3’ सारख्या लोकप्रिय आणि सुपरहिट चित्रपट मालिकेचा भाग होता येत आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या चित्रपटाची स्टारकास्टच इतकी जबरदस्त आहे की, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप खास आहे. सेटवर प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवणारा होता. त्यामुळे मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो, असे अर्चित म्हणाला.


आता ‘झिम्मा 3’च्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठ्या कलाकारांच्या फळीमध्ये काम करण्याची संधी अर्चितला मिळाली आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका नेमकी काय असणार आणि चित्रपटाच्या कथेत त्याचा सहभाग कसा असणार, हे मात्र प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच समजणार आहे. अभिनय, पाककला आणि व्यवसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अर्चितचा हा नवा अभिनयप्रवास नक्कीच लक्षवेधी ठरणार आहे. 1 जानेवारी 2027 रोजी ‘झिम्मा 3’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

7 वर्षांच्या मुलीची आई आणि अवघ्या काही महिन्यांचा अनुभव! प्यूर्टो रिकोच्या जेनिफर बॅरेटोने कसा रचला 75 व्या Miss Universe चा इतिहास?

सॅन जुआन : यंदाच्या 75 व्या Miss Universe सौंदर्यस्पर्धेचे विजेतेपद प्यूर्टो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हिने पटकावले आहे. 24 November

Fulwara Movie: वैदेही आणि प्रियदर्शिनीचा लावणी ठसका! ‘फुलवरा’मधील पहिली झलक समोर

Fulwara Movie: ‘नटरंग’नंतर तब्बल 16 वर्षांनी झी स्टुडिओज आणि रवी जाधव ही जोडी पुन्हा एकदा तमाशा आणि लावणीच्या विश्वात

GTA 6 मध्ये 44 वर्षांपूर्वीचं बंगाली गाणं! 'आज शनिवार'मुळे गायिका रुपा बिस्वास यांना ग्लोबल ओळख

मुंबई : तब्बल 44 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं बंगाली डिस्को गाणं आज पुन्हा जगभर चर्चेत आलं आहे. 1982 मध्ये रिलीज झालेलं

धक्कादायक खुलासा! कांगच्या वादापूर्वीच 'डॉक्टर डूम' होता मार्व्हलचा मास्टरप्लॅन? रॉबर्ट डाउनी ज्युनियरच्या एन्ट्रीमागचे गुपित उघड!

Avengers Doomsday : मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स मधील 5 वा अ‍ॅव्हेंजर्स चित्रपट 'ॲव्हेंजर्स: डूम्सडे' प्रदर्शित होण्यासाठी

Star Pravah 18 Years: लाखो मनांशी नातं जोडत स्टार प्रवाहची विश्वासाची 18 वर्षे

Star Pravah 18 Years: काही प्रवास फक्त अंतर पार करत नाहीत, तर मनं जोडतात… काही प्रवास केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांच्या

IFFI 2026 : इफ्फीमध्ये एन. डी. स्टुडिओच्या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांकडून भेट

गोवा : गोवा येथे सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) महाराष्ट्रातील चित्रपट