Tuesday, November 24, 2026

Bus Truck Collision UAE: UAE मध्ये भीषण बस-ट्रक अपघात! 13 जणांचा मृत्यू, भारतीयांचाही समावेश

संयुक्त अरब अमीरात (UAE) मधील रास अल खैमाह येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Bus Truck Collision UAE: संयुक्त अरब अमीरात (UAE) मधील रास अल खैमाह येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मंगळवारी 24 नोव्हेंबर रोजी संयुक्त अरब अमिराती (UAE) येथील रास अल खैमाह येथे हा भीषण अपघात घडला. एका प्रवासी बसची ट्रकशी अचानक धडक झाली. या अपघातात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहिती दुबईतील भारतीय दूतावासाने दिली.

अपघातानंतर, दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने मृत भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. तसेच पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत दुतोवास काम करत आहे. तर देखील अद्याप अपघातात मृत्यू झालेल्या किंवा जखमी झालेल्या भारतीय नागरिकांची संख्या अधिकृतपणे निश्चित झालेली नाही.

धडक झालेल्या बसमध्ये एकूण 41 प्रवासी होते. तांत्रिक बिघाडामुळे बस रस्त्याच्या कडेला उभी होती. अशातच एक भरधाव ट्रक येऊन तिला धडक दिली. हा अपघात मंगळवारी पहाटे अल वतन रोडवर घडला. बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल केले.

13 ठार, 14 जखमी

संयुक्त अरब अमिरातीच्या गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, हा अपघात रास अल खैमाह येथील अल वतन या रोडवर झाला. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात सुरुवातीला ११ जणांचा मृत्यू झाला. नंतर रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी दोन जखमींचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांचा आकडा १३ वर पोहोचला तर इतर १४ जण जखमी झाले असून, त्यापैकी काही जण गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

पीडितांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न

दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडिया पोस्टद्वारे या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे तसेच मृतांमध्ये भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. वाणिज्य दूतावासाने पीडितांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून मदत पुरवण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आहे. तसेच मदत घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी वाणिज्य दूतावासाने ८००-४६३४२ ही २४-तास टोल-फ्री हेल्पलाइन देखील सुरू केली आहे. अपघाताशी संबंधित अधिक माहिती देखील गोळा केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >