Wednesday, November 25, 2026

Crime News : दिल्लीतील कॅफेमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार, दोन महिलांसह तिघे अटकेत

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील प्रीत विहार परिसरात एका २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे. या घटनेत एकूण आठ जणांचा सहभाग असल्याचा आरोप असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कर्करडूमा येथील एका कॅफेमध्ये काम करते. तिची आरोपींशी आधीपासून ओळख होती. घटनेच्या दिवशी ती त्यांच्यासोबत पार्टीला गेली होती. या पार्टीत एकूण आठ जण सहभागी झाले होते. सोमवारी रात्री सर्वजण प्रीत विहारमधील एका कॅफेमध्ये गेले. हा कॅफे रात्री ११.३० वाजता बंद होतो. मात्र, पार्टीत सहभागी असलेल्या एका व्यक्तीकडे कॅफेची चावी असल्याने त्याने कॅफे उघडून उशिरा रात्री पार्टीचे आयोजन केले. यावेळी सर्वांनी मद्यपान केल्याची माहिती आहे.

कॅफेमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार

पहाटे साडेतीनच्या सुमारास सर्वजण कॅफेमधून बाहेर पडले. त्यानंतर काही वेळातच दोन तरुणांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसेच, या कृत्याला इतर सदस्यांनीही साथ दिल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, आतापर्यंत दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींच्या भूमिकेबाबतही पोलीस तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >