
मुंबई: गुन्हेगारी रोखणे आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना स्थानिक पातळीवरून माहिती मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सोनुआ परिसरात घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण व्यवस्थेलाच धक्का बसला आहे. ज्याच्यावर गावे आणि जंगलातील हालचालींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी होती, तोच व्यक्ती कथितपणे अफूच्या अवैध व्यापारात सामील असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कुंवर सिंह गागराई असे असून, तो पोलिसांसाठी विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) म्हणून कार्यरत होता.
पैसा दुप्पट करून देण्याच्या आमिषाला भुलून अलिबागमधील एका महिलेने तब्बल ५ लाख ३ हजार रुपये गमावल्याची घटना समोर आली आहे. परदेशातून भारतात यायचं आहे, ...
23 नोव्हेंबर रोजी सोनुआ पोलिसांनी बांझीकुसुम वळणाजवळ नाकाबंदी सुरू होती, यावेळी पोलिसांनी ही धडक कारवाई केली. कारवाईदरम्यान कुंवर सिंह गागराई आणि त्याचा साथीदार रेला होरो ऊर्फ रेला कच्छप यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 1.04 किलोग्रॅम अफू जप्त करण्यात आला असून, या अंमली पदार्थांची किंमत पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय पोलिसांनी त्यांच्याकडून नंबर प्लेट नसलेली एक मोटारसायकल आणि तीन स्मार्टफोनही जप्त केले आहेत. चक्रधरपूरचे एसडीपीओ डॉ. सैयद मुस्तफा हाशमी यांच्याकडून या संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली आहे.
दिल्ली : राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसरात आत्मघाती हल्ला घडवण्याचा कथित दहशतवादी कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर ...
चक्रधरपूरच्या एसडीओपी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, कुंवर सिंह गागराई याने एसपीओ पदाचा कथित गैरवापर करत अफूच्या काळ्या धंद्यात हात घातला. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्याला एसपीओ पदावरून हटवण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी माध्यमांना दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास केवळ अफू जप्त करण्यापुरता मर्यादित न ठेवता, पोलीस यंत्रणेशी संबंधित पदावर असताना बेकायदेशीर धंदा कसा काय चालवला गेला? याचाही सखोल तपास करत आहेत. शिवाय, या प्रकरणाचे पाळेमुळे कुठपर्यंत पसरत गेलेली आहेत, ह्याचाही तपास केला जात आहे.
गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देऊन त्यांचे ...
पोलिसांनी सुरूवातीला केलेल्या तपासात असे निष्पन्न झाले की, अटक करण्यात आलेले दोन्हीही आरोपी गेल्या तीन ते चार वर्षांपासून अफूची लागवड तसेच खरेदी- विक्रीच्या व्यवसायात सक्रिय होते. ते अफू कोठून मिळवत होते आणि कोणाकोणाला पुरवत होते, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तस्करीच्या जाळ्यात आणखी कोण कोण सामील आहे, याचाही तपास सुरू असून, दोघांची कसून चौकशी केली जात आहे. घटनेनंतर पोलिसांच्या स्थानिक माहिती यंत्रणेच्या देखरेखीवर आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर आणि पार्श्वभूमीवर नियमित लक्ष ठेवले जाते की नाही, असा सवाल विचारला जात आहे. पोलीस यंत्रणेशी जोडलेल्या पदाचा वापर एखाद्याने स्वतःच्या बेकायदेशीर फायद्यासाठी करणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. आता या संपूर्ण तस्करीचे जाळे उध्वस्त करण्यासोबतच पोलिसांच्या माहिती यंत्रणेचा विश्वास कायम राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.






