पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील नोकरदारांना वाहतूक कोंडीतून मेट्रोच्या पिंक मार्गिकेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोचे 3 नोव्हेंबर रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्धाटन करण्यात आले होते. या मार्गिकेवर एकूण 23 स्थानक असून आतापर्यंत 17 स्थानकं प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झाले असून आजपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये आणखीन दोन स्थानकं प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा असे दोन स्थानक आजपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत. यासोबतच आणखीन दोन स्थानकांचाही लवकरच या यादीमध्ये समावेश होणार आहे.
हिंजवडीकरांसाठी आनंदाची बातमी! वर्ष अखेरीस पुणे मेट्रो मार्गिकेवरील दोन स्थानक येणार सेवेत
पुणे: पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील नोकरदारांना कायमच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ...
माण, माण- एमआयडीसी सर्कल, माण बस डेपो, हिंजवडी फेज 2- सर्कल 2, हिंजवडी फेज 2- सर्कल 1, पद्मभूषण चौक, श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी फेज 1, वाकड चौक, श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मिटकॉन बालेवाडी, आर. के. लक्ष्मण संग्रहालय बालेवाडी, औंढ, सकाळ नगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ आणि ॲग्रीकल्चर कॉलेज असे 16 स्थानक आधीपासून सुरु आहेत. आज दुपारपासून पुणेकरांच्या सेवेमध्ये बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा हे दोन स्थानक दाखल होणार आहेत. त्यानंतर उर्वरित स्थानकं, बाणेर गाव, बाणेर पाषाण लिंक रोड, भोसले नगर- आरबीआय, शिवाजी नगर आणि पुणे जिल्हा न्यायालय ह्या मेट्रो स्थानकांचे काम सुद्धा अद्याप प्रलंबित असून लवकरच ते सुद्धा प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत.
EPFO New Rules 2026: PF पैसे आता हप्त्यांमध्ये काढता येणार? EPFO च्या नव्या योजनेत करसवलतीचाही प्रस्ताव
EPFO New Rules 2026: नोकरदार व्यक्तींसाठी, पीएफ हा केवळ बचतीचा स्रोत नाही, तर सेवानिवृत्तीनंतर मिळणारा आर्थिक आधारही असतो. आयुष्यभर केलेल्या कामाचे पगारातून पैसे ...
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर गाव (पीएमआर- 15) आणि बाणेर-पाषाण लिंक रोड (पीएमआर- 16) या दोन्ही महत्त्वाच्या स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सर्व काही सुरळीत पार पडल्यास येत्या डिसेंबर महिन्यात ही दोन्ही स्थानके प्रवाशांसाठी खुली होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गाला पुणेकरांकडून दमदार प्रतिसाद मिळत असून या मार्गावरून दिवसाला साधारण 50 हजार प्रवासी वापर करीत आहेत. जिल्हा न्यायालय, माण, आर. के. लक्ष्मण संग्रहालय बालेवाडी, श्री शिवछत्रपती शिवाजी चौक आणि वाकड चौक या स्थानकांवर प्रवाशांचा सध्या सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने दिली आहे.
Nashik Crime : एआरटीओ हेमाडे आत्महत्या प्रकरणाला नवे वळण ! मुलगा आणि सासऱ्याच्या कोठडीत वाढ
नाशिक : सेवानिवृत्त सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) हेमंत गोविंद हेमाडे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता अधिक गुंतागुंतीच्या वळणावर ...
पुणे मेट्रो लाईन 3 वरून हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गावर दिवसाला 20 मेट्रो धावत असून, दररोज सुमारे 300 फेऱ्या होत आहेत. गर्दीच्या वेळेमध्ये दर पाच मिनिटाला आणि इतरत्र वेळेत दर आठ मिनिटाला मेट्रो धावत आहे. प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून मेट्रोच्या गाड्या सुमारे 99 टक्के वेळेवर धावत असल्याचे पीआयटीसीएमआरएलकडून सांगण्यात आले आहे.