Rahu Ketu Gochar 2026: नशिबाचे फासे पलटणार! राहू-केतूच्या गोचरामुळे 'या' राशींचे चांगले दिवस सुरू; वाचा तुमची रास कोणती?

ज्योतिषशास्त्रानुसार, राहु आणि केतु यांनी बुधवारी राशी बदल केला आहे. 25 नोव्हेंबर 2026 रोजी संध्याकाळी 4 वाजून 34 मिनिटांनी हे ग्रह नव्या राशीत 18 महिन्यांसाठी स्थिरावले आहेत. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींवर काय परिणाम होणार ते...

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा एक गोचर कालावधी असतो. या गोचर कालावधीत ग्रह राशी बदल करत असतात. त्याचा परिणाम राशीचक्रावर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, राहु आणि केतु हे दोन्ही पापग्रह आहे. त्यात हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सातव्या स्थानी असतात. म्हणजेच एकमेकांच्या अगदी विरुद्ध असतात. त्यामुळे या पापग्रहांचा राशी बदल ज्योतिषशास्त्रातील मोठी घडामोड मानली जाते. राहु आणि केतु यांनी संध्याकाळी 4 वाजू 34 मिनिटांनी गोचर केला आहे. ज्योतिषींनुसार, राहु व्यक्तीच्या इच्छा, महत्त्वकांक्षा, भौतिक सुख सुविधा आणि अचानक होणाऱ्या बदलांशी निगडीत मानला जातो. तर केतु हा आध्यात्मिक, आत्मचिंतन आणि जुन्या कर्मांशी निगडीत मानला जातो. त्यामुळे या ग्रहांच्या राशी बदलामुळे सर्व 12 राशींवर परिणाम दिसून येईल. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना चांगले आणि कोणत्या राशींना सावध राहावं लागेल ते...


या राशींना येणार चांगले दिवस


मेष : राहु आणि केतुच्या गोचरामुळे या राशीच्या आयुष्यात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. करिअरच्या नव्या संधी या काळात चालून येतील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं या कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता आहे.


वृषभ: या राशीच्या जातकांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत आर्थिक स्थिती सुधारू शकते. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना या कालावधीत सकारात्मक बदल होतील.


वृश्चिक: या राशीच्या जातकांना राहु केतुच्या गोचरामुळे नवी उमेद मिळेल. या दरम्यान आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसेल. किचकट कामही चुटकीसरशी पूर्ण होईल, असं ग्रहमान आहे. नोकरी शोधणाऱ्या जातकांना चांगल्या संधी मिळतील.


मीन : या राशीच्या जातकांना सकारात्मक परिणाम दिसून येतील. काही अडकलेली कामं या कालावधीत पूर्ण होताना दिसतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.






या राशींनी राहावं सावध


मकर: या राशीच्या जातकांना गोचरामुळे अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी आल्याने ताण वाढेल. त्यात कामात निष्काळजीपणा होऊ नये यासाठी सावध राहावं.


कर्क: या राशीच्या जातकांनी आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्यावी. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. मनात विचारांचा काहूर माजेल. त्यामुळे निर्णय घेताना सावधपणे घ्यावा.


धनु: या राशीच्या जातकांनी या कालावधीत आर्थिक नियोजन करावं. पैसे उसने देऊ नका, परत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावा. मोठे आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.


तूळ : या राशीच्या जातकांनी काही बाबतीत काळजी घेणं गरजेच आहे. या दरम्यान कामाशी निगडीत नवी जबाबदारी खांद्यावर पडू शकते. कामाच्या ठिकाणी मानसिक थकवा वाढू शकतो. आर्थिक जोखिम घेऊ नका.

Comments
Add Comment

Astrology: बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण प्रतिपदा शके १९४८.चंद्र नक्षत्र रोहिणी .योग शिव.चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर ४

Astrology: मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शुभ.चंद्र राशी मेष ०७.२५ पर्यंत नंतर

रखडलेला पैसा परत मिळणार? नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी ३ राशींसाठी आर्थिक प्रगतीचे योग!

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीबरोबरच काही राशींसाठी ग्रहस्थिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिन्याच्या अगदी

Shani Gochar 2027: 3 जून 2027 पासून या राशीला साडेसाती, तर कुंभ राशी फेऱ्यातून सुटणार! जाणून घ्या

ऑक्टोबर महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. तर नववर्ष 2027 सुरू होण्यासाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी आहे.

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६