Fulwara Movie: वैदेही आणि प्रियदर्शिनीचा लावणी ठसका! ‘फुलवरा’मधील पहिली झलक समोर

‘नटरंग’नंतर तब्बल 16 वर्षांनी झी स्टुडिओज आणि रवी जाधव ही जोडी पुन्हा एकदा तमाशा आणि लावणीच्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे. लावणीच्या अदाकारीतून मराठी मातीचा साज खुलवणाऱ्या दोन चेहऱ्यांभोवती गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या उत्सुकतेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

Fulwara Movie: ‘नटरंग’नंतर तब्बल 16 वर्षांनी झी स्टुडिओज आणि रवी जाधव ही जोडी पुन्हा एकदा तमाशा आणि लावणीच्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे. लावणीच्या अदाकारीतून मराठी मातीचा साज खुलवणाऱ्या दोन चेहऱ्यांभोवती गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या उत्सुकतेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि रवी जाधव दिग्दर्शित ‘फुलवरा’ या आगामी चित्रपटातील वैदेही परशुरामी म्हणजेच मथुरा परितेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर म्हणजेच संगीता परितेकर यांचे लावणीमय रूप नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून समोर आले आहे. विशेष म्हणजे, या दोघींच्या रूपाची ही पहिली झलक चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवणारी ठरत आहे.

‘फुलवरा’च्या माध्यमातून लावणीचा पारंपरिक बाज, कलावंतांचे आयुष्य आणि या कलेसाठी त्यांनी घेतलेला संघर्ष मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या व्यक्तिरेखांबद्दल कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. मात्र आता त्यांच्या व्यक्तिरेखा समोर आल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. बॉलीवूडमध्ये देखील श्रद्धा कपूरचा ईठा हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीलाही तमाशा आणि लावणीविश्वाचं वेड लागलं आहे.






या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक रवी जाधव यांनी, “लावणी ही महाराष्ट्राची ओळख अभिमानाने मिरवणारी लोककला आहे. ‘फुलवरा’तील या दोन कलाकारांचे रूप समोर आणणे आमच्यासाठी विशेष महत्त्वाचे होते. हे केवळ चेहरा अनावरण नसून आपल्या मातीतल्या कलेला आणि तिचा वारसा जपणाऱ्या कलावंतांना दिलेली मानवंदना आहे," असे त्यांनी सांगितले.


अभिनेत्री वैदेही परशुरामी आपल्या या अनुभवाबद्दल सांगतांना, “लावणी ही केवळ नृत्याची शैली नाही, तर तिच्या प्रत्येक अदाकारीमागे एक स्वतंत्र भावविश्व, ताकद आणि आत्मभान दडलेलं आहे. ‘फुलवरा’मधील माझी व्यक्तिरेखा साकारताना या कलेचा बारकाईने अभ्यास करण्याची आणि स्वतःला नव्याने घडवण्याची संधी मिळाली. या भूमिकेने अभिनेत्री म्हणून माझ्यासमोर अनेक नवी आव्हानं उभी केली, पण त्याचबरोबर खूप काही शिकवलंही. आजवर प्रेक्षकांनी मला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे; मात्र ‘फुलवरा’मधील माझं हे रूप त्यांच्यासाठी नक्कीच वेगळं ठरेल.”


तर प्रियदर्शिनी इंदलकर हिने “एखाद्या भूमिकेचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर येतो, तेव्हा कलाकारासाठी तो क्षण नेहमीच खास असतो. ‘फुलवरा’च्या बाबतीत हा अनुभव अधिकच अविस्मरणीय आहे. कारण हा केवळ माझ्या व्यक्तिरेखेचा चेहरा समोर येण्याचा क्षण नसून, एका समृद्ध लोककलेच्या परंपरेशी जोडल्या गेलेल्या प्रवासाची सुरुवात आहे. लावणीच्या विश्वात प्रवेश करताना तिचा डौल, तिच्यातील नजाकत आणि त्यामागची मेहनत जवळून अनुभवता आली. प्रेक्षकांनी आजवर माझ्या कामाला दिलेलं प्रेम लक्षात घेता, माझं हे नवं रूप त्यांच्यासाठी एक सुखद धक्का ठरेल, अशी आशा आहे, असे म्हणाली.


‘फुलवरा’ हा चित्रपट 14 जानेवारी 2027 रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून लावणीचा नजाकतदार ठसका, तमाशाच्या फडातील रंगत आणि मराठी संस्कृतीचा अभिमान घेऊन येणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. याशिवाय यामध्ये आणखी कोणकोणते कलाकार असतील याबद्दलची उत्कंठासुद्धा निर्माण झाली असून नव्या वर्षात मोठ्या पडद्यावर रंगणाऱ्या या लावणीच्या संगीतबारीची चाहूल आता लागली आहे!

Comments
Add Comment

GTA 6 मध्ये 44 वर्षांपूर्वीचं बंगाली गाणं! 'आज शनिवार'मुळे गायिका रुपा बिस्वास यांना ग्लोबल ओळख

मुंबई : तब्बल 44 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं बंगाली डिस्को गाणं आज पुन्हा जगभर चर्चेत आलं आहे. 1982 मध्ये रिलीज झालेलं

धक्कादायक खुलासा! कांगच्या वादापूर्वीच 'डॉक्टर डूम' होता मार्व्हलचा मास्टरप्लॅन? रॉबर्ट डाउनी ज्युनियरच्या एन्ट्रीमागचे गुपित उघड!

Avengers Doomsday : मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स मधील 5 वा अ‍ॅव्हेंजर्स चित्रपट 'ॲव्हेंजर्स: डूम्सडे' प्रदर्शित होण्यासाठी

Star Pravah 18 Years: लाखो मनांशी नातं जोडत स्टार प्रवाहची विश्वासाची 18 वर्षे

Star Pravah 18 Years: काही प्रवास फक्त अंतर पार करत नाहीत, तर मनं जोडतात… काही प्रवास केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांच्या

IFFI 2026 : इफ्फीमध्ये एन. डी. स्टुडिओच्या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांकडून भेट

गोवा : गोवा येथे सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) महाराष्ट्रातील चित्रपट

'आदि अनंत' मधून आजोबा-नातवाच्या नात्याची हळवी गोष्ट; इफ्फीमध्ये झाली चर्चा

गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित

अक्षयच्या कामाची शिस्त आणि दीपिकाचा हक्क! करण जोहरने मांडली फिल्म इंडस्ट्रीतील कामाच्या तासांवर भूमिका

'कॉफी विद करण' शोच्या नवव्या सीझनच्या येत्या भागात अभिनेते अक्षय कुमार आणि रवि किशन उपस्थित राहणार आहेत. या