Star Pravah 18 Years: लाखो मनांशी नातं जोडत स्टार प्रवाहची विश्वासाची 18 वर्षे

काही प्रवास फक्त अंतर पार करत नाहीत, तर मनं जोडतात… काही प्रवास केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. असाच प्रवास पूर्ण करत स्टार प्रवाह वाहिनीने १८ वर्ष पूर्ण केली आहेत. आणि या 18 वर्षांत महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे.

Star Pravah 18 Years: काही प्रवास फक्त अंतर पार करत नाहीत, तर मनं जोडतात… काही प्रवास केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. असाच प्रवास पूर्ण करत स्टार प्रवाह वाहिनीने १८ वर्ष पूर्ण केली आहेत. आणि या 18 वर्षांत महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. स्टार प्रवाहचा 18 वर्षांचा प्रवास हा असाच प्रेमाचा, विश्वासाचा, आणि अभिमानाचा आहे. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी हे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या स्टार प्रवाहने गेल्या १८ वर्षांत मराठी मनोरंजनविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बदलत्या काळानुसार प्रेक्षकांची अभिरुची, मनोरंजनाची माध्यमं आणि आशय बदलत असताना स्टार प्रवाहने मात्र प्रेक्षकांशी जोडलेलं आपुलकीचं नातं कायम जपलं आहे.






या प्रवासात अनेक लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अनेक व्यक्तिरेखा घराघरांत पोहोचल्या. कधी हसवलं, कधी रडवलं, कधी नात्यांची नवी परिभाषा शिकवली, तर कधी सामाजिक विषयांना मनोरंजनाच्या माध्यमातून प्रभावीपणे हात घातला. प्रत्येक मालिकेने, प्रत्येक कथेने आणि प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. मराठी संस्कृती, परंपरा आणि आधुनिक विचार यांचा सुंदर संगम घडवत वाहिनीने आपल्या कार्यक्रमांमधून महाराष्ट्राच्या मातीतली नाळ कायम जपली.


या 18 वर्षांच्या यशस्वी वाटचालीमागे कलाकारांसोबतच लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, पडद्यामागील संपूर्ण टीम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टार प्रवाहवर भरभरून प्रेम करणारे लाखो प्रेक्षक या प्रत्येकाचं योगदान मोलाचं राहिलं. त्यानिमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच स्टार प्रवाह वाहिनीचा यापुढील प्रवास अधिक रंजक आणि उत्कंठावर्धक असेल यात शंका नाही, असेही त्यांनी सांगितले.


स्टार प्रवाह वाहिनीवरील मन उधाण वाऱ्याचे, तुजविण सख्यारे रे, देवयानी, स्वप्नांच्या पलीकडले, पुढंच पाऊल, विठू माऊली यांसारख्या अनेक सदाबहार मालिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तर आताच्या ठरलं तर मग, बाई तुझा आशीर्वाद, तुझ्याकडे तुला मागणे, घरोघरी मातीच्या चुली, यांसारख्या मालिका वहिनीला नंबर 1 ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत.

Comments
Add Comment

IFFI 2026 : इफ्फीमध्ये एन. डी. स्टुडिओच्या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांकडून भेट

गोवा : गोवा येथे सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) महाराष्ट्रातील चित्रपट

'आदि अनंत' मधून आजोबा-नातवाच्या नात्याची हळवी गोष्ट; इफ्फीमध्ये झाली चर्चा

गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागात प्रदर्शित

अक्षयच्या कामाची शिस्त आणि दीपिकाचा हक्क! करण जोहरने मांडली फिल्म इंडस्ट्रीतील कामाच्या तासांवर भूमिका

'कॉफी विद करण' शोच्या नवव्या सीझनच्या येत्या भागात अभिनेते अक्षय कुमार आणि रवि किशन उपस्थित राहणार आहेत. या

Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या बंगळुरू कॉन्सर्टला बॉम्बस्फोटाची धमकी; मेट्रो स्थानकांनाही लक्ष्य करण्याचा इशारा

कर्नाटक येथील हुबळी-धारवाड महानगरपालिकेला मंगळवारी (२४ नोव्हेंबर) एक ईमेल प्राप्त झाला, ज्यामध्ये २९ नोव्हेंबर

Shahid Kapoor : शाहिद कपूरने खरेदी केली नवी Land Rover Defender OCTA कार; किंमत 3 कोटी रुपये

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पुन्हा एकदा आपल्या लक्झरी कारच्या खरेदीमुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकतीच Land Rover

IMDb Trending: रावणापेक्षाही कुंभकर्णाची चर्चा! IMDb च्या यादीत फैसल मलिक अव्वल

भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू