अॅग्रीस्टॅकमुळे 1 कोटी 44 लाख शेतकऱ्यांना मिळाली डिजिटल ओळख; महाराष्ट्र देशात दुसरा

शेतकऱ्याला आता योजनेसाठी वारंवार कागदपत्रं घेऊन फिरावं लागणार नाही. एकच ओळख, एकच आयडी आणि सगळ्या योजना एका क्लिकवर, असं चित्र आता महाराष्ट्रात तयार होतंय. अॅग्रीस्टॅक योजनेमुळे राज्यातल्या 1 कोटी 44 लाख शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळाला आहे. यामुळे देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. अॅग्रीस्टॅक म्हणजे शेतीसाठीचं डिजिटल व्यासपीठ. प्रत्येक शेतकऱ्याला त्याची स्वतंत्र डिजिटल ओळख देणं, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 18 ऑक्टोबर 2024 पासून राज्यात ही योजना सुरू झाली. 2021 च्या कृषी गणनेनुसार राज्यात 1.71 कोटी खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी 1 कोटी 44 लाख शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. उरलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे.


या आयडीमुळे काय फायदा होणार? तर पीक विमा, आपत्तीची नुकसानभरपाई, कृषी पायाभूत सुविधा निधी, शेतीसाठी कर्ज, या सगळ्या योजनांचा लाभ घेणं सोपं होणार आहे. शेतकऱ्याची आणि त्याच्या जमिनीची माहिती आधारशी जोडलेली असल्यामुळे लाभार्थीची तपासणी सोपी झाली आहे. पुन्हा पुन्हा जमिनीची मालकी सिद्ध करावी लागत नाही. कागदपत्रांची कटकट कमी झाली आहे. 15 एप्रिल 2025 पासून कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. पीएम किसानच्या नुकत्याच वाटप झालेल्या 24 व्या हप्त्यात राज्यातल्या 85.58 लाख लाभार्थ्यांपैकी 84.60 लाख शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक आयडी होता, असंही भरणे यांनी सांगितलं. सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांचीही नोंदणी होत आहे. त्यांच्या नोंदीत ‘जॉईंट’ असा शेरा दिला जातो.






वनपट्टेधारक शेतकऱ्यांनाही या योजनेत आणलं जातंय. राज्यात जवळपास 2 लाख वनपट्टेधारक आहेत. त्यातल्या 1 लाख 58 हजारांची माहिती आदिवासी विकास विभागाकडून मिळाली असून 78 हजारांची नोंदणी पूर्ण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांची प्रकरणं वेगळी आहेत, अपवादात्मक आहेत, त्यांनाही आता आयडी मिळणार आहे. यासाठी महसूल विभागाने 6 नोव्हेंबरला शासन निर्णय काढला आहे. ग्राम महसूल अधिकारी तपासणी करतील, मंडळ अधिकारी पडताळणी करतील आणि तहसीलदार अंतिम मान्यता देतील. त्यानंतर सीएससीमार्फत नोंदणी होईल. खरीप 2023 पासून राज्यात डिजिटल क्रॉप सर्व्हे, म्हणजे ई-पीक पाहणी सुरू आहे. खरीप 2026 मध्ये 3.10 कोटींपेक्षा जास्त प्लॉटचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून फार्मर आयडी काढला नाही, त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करावी किंवा mhfr.agristack.gov.in या पोर्टलवरूनही नोंदणी करता येईल, असं आवाहन कृषिमंत्र्यांनी केलं आहे.

Comments
Add Comment

राज्यात 174 नव्या डिजिटल सेवांचा शुभारंभ! 26 जानेवारीपर्यंत सरकारी कामकाजात मोठा बदल; मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यातील शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पारदर्शक, गतिमान आणि मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून

Raigad News : फ्लॅट नव्हे, गावाच्या पद्धतीनुसार घरे बांधणार; दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राधान्य

रायगड: दरड दुर्घटनांमध्ये घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना आता फ्लॅट पद्धतीने नव्हे, तर त्यांच्या गावाच्या

Chandrashekhar Bawankule : राज्यातील प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र मालमत्ता पत्रिका

मुंबई : राज्यातील प्रत्येक सदनिकेची स्वतंत्र मालमत्ता पत्रिका तयार करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

Pune Mumbai Highway : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर; 18.40 लाखांचा निधी मंजूर

मुंबई : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातांचे धोके कमी करण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाने महत्त्वाचे

Sunetra Pawar : क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी अन्य संकुलांकडे वळविणार - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

अनुदान मर्यादेबाहेरील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर तातडीने मांडण्याचे आदेश मुंबई : राज्यातील विविध क्रीडा

Devendra Fadnavis : न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

मुंबई : दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन संवेदनशील आहे. मागण्यांची पूर्तता करण्यासाठी