Sunetra Pawar : क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी अन्य संकुलांकडे वळविणार - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

राज्यातील विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलांना प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात राज्य क्रीडा विकास समितीची बैठक गुरुवारी सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत राज्यातील विविध तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. शासकीय अनुदानाच्या निर्धारित मर्यादेत असलेल्या प्रस्तावांना बैठकीतच प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

अनुदान मर्यादेबाहेरील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर तातडीने मांडण्याचे आदेश


मुंबई : राज्यातील विविध क्रीडा संकुलांसाठी मंजूर झालेला निधी दीर्घकाळ खर्चाविना पडून असल्यास तो संबंधित समित्यांकडून परत घेऊन निधीची आवश्यकता असलेल्या अन्य संकुलांना वितरित करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी गुरुवारी दिले. उपलब्ध निधीचा तातडीने विनियोग करण्याबरोबरच शासकीय अनुदानाच्या मर्यादेबाहेरील क्रीडा संकुलांचे प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर तातडीने सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.






राज्यातील विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलांना प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात राज्य क्रीडा विकास समितीची बैठक गुरुवारी सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत राज्यातील विविध तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. शासकीय अनुदानाच्या निर्धारित मर्यादेत असलेल्या प्रस्तावांना बैठकीतच प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

क्रीडा सुविधांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू नये आणि उपलब्ध निधीचा योग्य विनियोग व्हावा, यासाठी अखर्चित निधीचा आढावा घेण्याचे निर्देश पवार यांनी दिले. दीर्घकाळ निधी खर्च न करणाऱ्या संबंधित समित्यांकडून तो परत घेऊन ज्या क्रीडा संकुलांना निधीची तातडीने आवश्यकता आहे, त्यांच्याकडे वळविण्यात यावा. तसेच संकुलांकडे शिल्लक असलेला निधीही त्वरित खर्च करण्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. अनुदान मर्यादेबाहेरील संकुलांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी ते मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर तातडीने मांडण्याची सूचनाही त्यांनी केली.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

मुंबई : दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन संवेदनशील आहे. मागण्यांची पूर्तता करण्यासाठी

Auto Rickshaw Scheme : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार रिक्षा व्यवसायाची संधी; 5 वर्षांत 1 लाख रिक्षांचे वाटप

मुंबई : दुष्काळ, शेतीमालाला कमी भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी

हजारो दिवे आणि मशालींनी रायगड कसा उजळला, थरारक सोहळा पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; पाहा Video

रायगड: हिंदवी स्वराज्याचे अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा दुर्गराज रायगडावर

Caste Validity Certificate: जात वैधता प्रमाणपत्रासाठी आता सरकारी कार्यालयांचे हेलपाटे बंद! अर्जापासून सुनावणीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार

जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांना करावी लागणारी सरकारी कार्यालयांची धावपळ आता कमी

NCMC कार्डधारकांसाठी खुशखबर! 11.80 रुपयांचे कमिशन बंद, रिचार्जची मर्यादा कमी झाली

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एनसीएमसी (National Common Mobility Card) कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा

Prahaar Marathi News Live 26 November 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live दिनांक 26 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,