Asia Cup Rising Stars 2026, IND vs SL: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, कर्णधार तिलक वर्मा प्रथम फलंदाजी घेत म्हणाला..

एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि श्रीलंका ए यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार तिलक वर्माने प्रथम फलंदाजी स्वीकारली.

एसीसी मेन्स आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत ए आणि श्रीलंका ए यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात विजेत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार तिलक वर्मा याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया ए संघाचा कर्णधार तिलक वर्मा म्हणाला की, 'आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. सर्वप्रथम, वैभवने एक जबरदस्त खेळी केली. त्याच वेळी, हा एक नवीन दिवस आणि नवीन सामना आहे. आम्ही या सामन्यावर लक्ष केंद्रित करून चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या मैदानापेक्षा ही खेळपट्टी दुसऱ्या डावात वेगळी वागते. दुसऱ्या डावात फलंदाजी करणे थोडे अधिक कठीण असते. एक बदल संघात केला आहे. प्रभसिमरनच्या जागी तनुष कोटियन पदार्पणाचा सामना खेळत आहे.'



काय म्हणाला श्रीलंकेचा कर्णधार?


श्रीलंका ए संघाचा कर्णधार पवन रत्नायकेला प्रथम फलंदाजी करायची होती? हा प्रश्न विचारल्यानंतर म्हणाला की, 'हो, मला वाटतं ते अधिक चांगलं आहे . पण मला वाटतं आम्ही गोलंदाजी करायचं ठरवलं असतं. आम्ही या खेळपट्टीवर यापूर्वी खेळलो आहोत. मला वाटतं या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणं अधिक सोयीचं आहे. आमच्या संघात एक बदल आहे - दुलाज बाहेर गेला आहे आणि गरुका संघात आला आहे.' दरम्यान, भारताकडून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी मैदानात उतरली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आक्रमक खेळीची अपेक्षा क्रीडाप्रेमींना आहे.मागच्या सामन्यात अवघ्या 52 चेंडूत वैभव सूर्यवंशीने द्विशतक ठोकलं होतं. त्यात 28 षटकारांचा समावेश आहे.






दोन्ही संघांची प्लेइंग 11


श्रीलंका ए संघ : लसिथ क्रूसपुल्ले, सिनेथ जयवर्धने, निशान मदुष्का (यष्टिरक्षक), पवन रथनायके (कर्णधार), निपुन धनंजया, जनिथ लियानागे, रविंदू फर्नांडो, वनुजा सहन, विजयकांत व्यासकांत, लाहिरू समरकून, गरुका संकेथ.


भारत ए संघ : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, शाहबाज अहमद, सूर्यांश शेडगे, तनुष कोटियन, हर्ष दुबे, हर्षित राणा, अर्शद खान.

Comments
Add Comment

IPL ट्रेडिंगमध्ये मोठा धमाका! हार्दिक पांड्याचा RR व्यवहार का फिसकटला? शमी-आर्चर जोडीने रचला नवा डाव!

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामापूर्वी खेळाडूंच्या अदलाबदलीवरून (ट्रेड) मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे.

क्रीजवर कोणीच नाही, तरीही बॉल टाकला अन् फलंदाज OUT! क्रिकेटमधील हा अजब नियम तुम्हाला माहिती आहे का? VIDEO

वुमन्स बिग बॅश लीग 2026 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात लढत झाली. या

केन विल्यमसन आता थेट मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत; SA20 मध्ये नवी इनिंग!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केन विल्यमसनने आता एका नव्या आणि

उधार घेतलेली बॅट अन् बदललेलं नाव! दुसऱ्या कसोटीपूर्वी ऋषभ पंतने न्यूझीलंडमध्ये खेळला लोकल सामना; VIDEO व्हायरल

भारत न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्च येथे सुरू होमार आहे. या

IND vs SL Semifinal Live Streaming: फायनलच्या तिकिटासाठी भारत-श्रीलंका भिडणार! कधी, कुठे पाहता येणार सामना?

भारत ए संघाने साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात युएईचा सात गडी राखून धुव्वा उडवत आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या

ACC Men's Asia Cup Rising Stars 2026 : भारताला उपांत्य फेरीत श्रीलंकेचे आव्हान

भारत 'ए' संघाने युएईला पराभूत करून एसीसी मेन्स रायझिंग स्टार्स आशिया कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नेपाळ आणि