वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या वापरावर बंदी; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही वाहन धुण्यास मनाई

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सर्व महापालिका क्षेत्रांत वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही वाहन धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली असून, असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.


पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुण्यासारख्या कामांसाठी होऊ नये, यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रांत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.






या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांमार्फत लवकरच शासन आदेश जारी करण्यात येणार आहेत. त्यानंतर महापालिका क्षेत्रांमध्ये संबंधित यंत्रणांना कारवाई करता येणार आहे. हा निर्बंध सार्वजनिक ठिकाणांपुरता मर्यादित नसून, गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातही पिण्याच्या पाण्याने वाहने धुण्यास मनाई असेल. सोसायट्यांमध्ये असा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाणार आहे. संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा विचार करून नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहनही बावनकुळे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

अॅग्रीस्टॅकमुळे 1 कोटी 44 लाख शेतकऱ्यांना मिळाली डिजिटल ओळख; महाराष्ट्र देशात दुसरा

शेतकऱ्याला आता योजनेसाठी वारंवार कागदपत्रं घेऊन फिरावं लागणार नाही. एकच ओळख, एकच आयडी आणि सगळ्या योजना एका

राज्यात 174 नव्या डिजिटल सेवांचा शुभारंभ! 26 जानेवारीपर्यंत सरकारी कामकाजात मोठा बदल; मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यातील शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पारदर्शक, गतिमान आणि मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून

Raigad News : फ्लॅट नव्हे, गावाच्या पद्धतीनुसार घरे बांधणार; दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राधान्य

रायगड: दरड दुर्घटनांमध्ये घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना आता फ्लॅट पद्धतीने नव्हे, तर त्यांच्या गावाच्या

Chandrashekhar Bawankule : राज्यातील प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र मालमत्ता पत्रिका

मुंबई : राज्यातील प्रत्येक सदनिकेची स्वतंत्र मालमत्ता पत्रिका तयार करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

Pune Mumbai Highway : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर; 18.40 लाखांचा निधी मंजूर

मुंबई : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातांचे धोके कमी करण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाने महत्त्वाचे

Sunetra Pawar : क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी अन्य संकुलांकडे वळविणार - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

अनुदान मर्यादेबाहेरील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर तातडीने मांडण्याचे आदेश मुंबई : राज्यातील विविध क्रीडा