मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची पावसाळा पूर्वतयारी बैठक संपन्न

आगामी पावसाळा 2027 मध्ये मुंबईची लाइफलाइन ठप्प होऊ नये यासाठी महापालिकेने 6 महिन्यांचा कंबर कसून नियोजन सुरू केले आहे. पाणी साचणे, झाडे पडणे आणि दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी सर्व यंत्रणांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आगामी पावसाळा 2027 च्या पार्श्वभूमीवर रस्ते, रेल्वे वाहतुकीच्या अनुषंगाने नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीने विविध यंत्रणांनी आपआपसात उत्तम समन्वय साधावा. सरत्या वर्षातील पावसाळ्यादरम्यान आलेल्या घटना तसेच अनुभवातून येत्या कालावधीतील पावसाळ्याची तयारी करण्यासाठी अधिक कार्यक्षमपणे उपाययोजना कराव्यात. आगामी सहा महिन्यांच्या महत्वपूर्ण कालावधीचा नियोजनबद्दरित्या वापर करून नागरिकांना पावसाळा कालावधीत दिलासा मिळेल, या अनुषंगाने तयारीला लागावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिले. सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे आपल्या अनुभवांसह आणि उत्तम समन्वयाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


विविध यंत्रणांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणांची नियमितपणे माहितीची उपलब्धता करून देण्यात यावी. मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) घटनांच्या अनुषंगाने अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कामांमध्ये प्रमाणित कार्यपद्धतीचा वापर करण्यावर भर द्यावा. नाल्यांच्या परिसरात जाळ्यांचा वापर करण्याकामी उपाययोजना कराव्यात. तसेच दरड प्रवण क्षेत्रांमध्ये सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी दिले.


आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या विविध विभागांची बैठक महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी 25 नोव्हेंबर 2026 रोजी संपन्न झाली.


या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सहआयुक्त यांच्या सह सातही परिमंडळांचे उप आयुक्त, सहायक आयुक्त, विविध विभागांचे खाते प्रमुख, संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला महानगरपालिकेच्या विविध खात्यांचे खाते प्रमुख आणि मध्य व पश्चिम रेल्वे, मुंबई वाहतूक पोलिस, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एस आर ए) राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व वाहतूक उपक्रम (बेस्ट), टाटा पॉवर, अदानी एनर्जी आदींच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीस हजर होते.






या बैठकीदरम्यान महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.


रस्ते वाहतुकीच्या अनुषंगाने पावसाचे पाणी साचण्याची माहिती देणारी पहिली व्यक्ती ही वाहतूक पोलीस असते. मुंबई महानगरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी सविस्तर माहिती देणे अपेक्षित आहे. पर्जन्यमानानुसार पाणी साचल्याचा कालावधी आणि पाणी निचरा होण्यासाठी लागलेला वेळ, अशी सविस्तर माहिती मिळणे अपेक्षित आहे. या माहितीच्या आधारावर पर्जन्य जलवाहिन्या विभागाने उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिले. पावसाळा कालावधीत रस्ते आणि रेल्वे वाहतूक खोळंबल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. अशावेळी पाणी साचणे आणि झाडे कोसळणे यासारख्या गोष्टींमुळे वाहतूक ठप्प होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी रेल्वे, बेस्ट, वाहतूक पोलीस, उद्यान विभाग यासारख्या यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे, असे बांगर म्हणाले.


रेल्वे मार्गावर झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी उद्यान विभागाच्या समन्वयातून योग्य उपाययोजना कराव्यात. तसेच रस्ते वाहतुकीच्या अनुषंगाने रस्त्या लगतच्या झाडांचेही सर्वेक्षण व्हावे. रस्ते विभाग आणि उद्यान विभाग यांनी धोकादायक स्थितीतील झाडांचे सर्वेक्षण करावे. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत झाडे कोसळण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळणे शक्य होईल, असे बांगर म्हणाले.


कुर्ला, शीव, चुनाभट्टी, परळ, मानखुर्द यासारख्या रेल्वे स्थानक परिसरात साचणाऱ्या पाण्याच्या अनुषंगाने रेल्वे आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाने नियोजित कामे हाती घ्यावीत. रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीच्या अनुषंगाने पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा शोध घ्यावा. तसेच आगामी सहा महिन्यांचा कालावधी पाहता उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश बांगर यांनी दिले.


भूमीगत मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या अनुषंगाने विद्यमान उपाययोजनांचा आढावा घेण्यात यावा. तसेच उन्नत मेट्रो आणि पूल याठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्या सुस्थितीत आहेत, याबाबतची चाचपणी करून योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना बांगर यांनी दिल्या.


नाल्यांमध्ये कचरा टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी नाल्यांच्या बाजुला जाळ्या लावण्यात येत आहेत. पर्जन्य जलवाहिन्या आणि प्रशासकीय विभागाच्या माध्यमातून काही ठिकाणी जाळ्या लावण्याची कामे सुरू आहेत. तसेच काही ठिकाणी उंच झोपड्यांच्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीच्या जाळ्या बसवता येतील, याबाबतची चाचपणी सुरू असल्याचेही बांगर म्हणाले.


मुंबईत पावसाळा कालावधीत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आणि आपत्कालीन घटना घडतात. शॉर्टसर्किट, घर आणि इमारत कोसळणे, दरड कोसळणे, पाणी साचणे यासारख्या घटनांचा सारासार विचार करता, विविध यंत्रणांनी समन्वयनाने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

Comments
Add Comment

Mumbai Coastal Road: कोस्टल रोड प्रकल्पस्थळांची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या आणि पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक वेगवान

कांदिवली डहाणूकरवाडी स्मशानभूमीतील लाकडी दहन सुविधा 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2026 दरम्यान तात्पुरती बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर दक्षिण’ विभागातील कांदिवली येथील डहाणूकरवाडी

Save Mumbai Playgrounds: मुंबईतील मैदाने आणि उद्याने खासगी संस्थांच्या ताब्यात का? पालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनाला सवाल!

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील मैदाने आणि उद्याने खासगी संस्थांच्या ताब्यात का असा सवाल उपस्थित करतमुंबईतील

सौरऊर्जा प्रकल्पांमुळे BMC च्या वीजबिलात 47.73 टक्क्यांची घट, वीज वापरात 12,383 युनिट्सची बचत

मुंबई(विशेष प्रतिनिधी): ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने मुंबई

26/11 च्या जखमा आजही ताज्या! उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला मोठा सवाल

Mumbai 26/11 attack: मुंबई दहशतवादी हल्ल्या 26/11 म्हंटल की ती काळी रात्र आजही डोळ्यासमोरून जात नाही. समुद्रमार्गे आलेल्या 10

26/11 Terrorist Attack: मुंबईला हादरवणारे बॉम्बस्फोट! काळजात धस्स करणाऱ्या 'या' घटना

मुंबई: 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईकर केव्हाच विसरू शकणार नाहीत. मुंबईकरांच्या इतिहासातील हा काळा दिवस होता. 26