मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर दक्षिण’ विभागातील कांदिवली येथील डहाणूकरवाडी स्मशानभूमीतील लाकडी दहन सुविधेच्या वायुप्रदूषण नियंत्रण प्रणालीतील विद्यमान चिमणी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या अनुषंगाने शनिवार, 28 नोव्हेंबर 2026 ते बुधवार, 2 डिसेंबर 2026 (दोन्ही दिवसांसह) या कालावधीत स्मशानभूमीतील लाकडी दहन सुविधा एकूण पाच दिवस तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. तथापि, या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्मशानभूमीतील एक विद्युत दाहिनी आणि एक पीएनजी दाहिनी नागरिकांच्या सेवेसाठी सुरू राहणार आहे.
Egypt tanker fire: टँकर उलटला आणि महामार्ग पेटला! इजिप्तमध्ये 31 जणांचा मृत्यू
Egypt Tanker Fire: इजिप्तची राजधानी कैरोमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कैरोमध्ये भीषण अपघात झाला आहे. इजिप्तमधील महामार्गावर तेलाच्या टँकरने पेट घेतला. इंधनाने ...
कामांतर्गत विद्यमान चिमणी काढणे, त्या ठिकाणी नवीन चिमणी बसविणे तसेच ट्रंक कनेक्शनची आवश्यक जोडणी करणे आदी कामांचा समावेश आहे. ही कामे सुरक्षितरीत्या पूर्ण करण्यासाठी लाकडी दहन सुविधा निर्धारित कालावधीत बंद ठेवणे आवश्यक आहे.
वायुप्रदूषण नियंत्रण प्रणालीतील चिमणी बदलण्याच्या कामामुळे दहन प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱया धुराच्या व्यवस्थापनास मदत होणार आहे. नमूद कालावधीत नागरिकांनी पर्यायी दहन सुविधांचा वापर करावा, असे आवाहन आर दक्षिण विभागामार्फत करण्यापत आले आहे.