Mumbai Coastal Road: कोस्टल रोड प्रकल्पस्थळांची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली पाहणी

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. कामाचा वेग, गुणवत्ता आणि वाहतूक नियोजन याचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या आणि पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक वेगवान व सुलभ करणाऱ्या मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कामांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी काल प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन आढावा घेतला.वेसावे ते भाईंदर या दोन शहरांना किनारी मार्गाने जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर-भाईंदर जोडरस्ता अशा एकूण सात पॅकेजमध्ये करण्यात येत आहे.


प्रकल्पाच्या पॅकेज ए अंतर्गत अमरनाथ टॉवर, कवठे खाडी येथील कामांची बांगर यांनी पाहणी केली. या ठिकाणच्या कामांना अधिक गती देण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची संख्या वाढवावी, तसेच या ठिकाणी तात्पुरता पोहोच रस्ता आणि काटकोनात तात्पुरता पूल उभारणी यांची कामे समांतर पद्धतीने व्हावी, जेणेकरून कामे गतीने पुढे जातील, असे निर्देश बांगर यांनी दिले.(Coastal Road Project)






लोखंडवाला आंतरबदल याठिकाणी प्रत्यक्ष पुलाच्या पायलिंगचे काम सुरू झाले आहे. येथे पुलाच्या पायलिंगसोबतच अदानी पावरची उच्च दाबाची विद्युत वाहिनी शिफ्ट करायची आहे. याचेही पायलिंगचे काम त्वरित सुरू करावे आणि पायलिंग सुरू केल्यापासून 100 दिवसांमध्ये ते काम पूर्ण करावे.जेणेकरून मर्यादित कालावधीमध्ये उच्च दाबाची विद्युत वाहिनी शिफ्ट करता येईल. आणि प्रत्यक्ष पुलाचे काम सुरू होईल, असे बांगर यांनी सांगितले.


प्रकल्पाच्या पॅकेज बी अंतर्गत माईंडस्पेस मालाड आंतरबदलाची बांगर यांनी संपूर्ण पाहणी केली. याठिकाणी जवळपास चार हजार मीटर लांबीचा तात्पुरता प्रवेश पूल बांधला जाणार आहे. येथे सात दिशेने समांतर पध्दतीने टॅबची पायलिंग केले जाईल हे सुनिश्चित करावे. तसेच हा टॅब बांधणीचा दर कुठल्याही परिस्थितीत दोन मीटर प्रति दिवसपेक्षा खाली येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.






पॅकेज सी येथे रहेजा यांच्या जमिनीच्या ठिकाणी रिट्रीवल शाफ्ट तयार केला जाणार आहे. त्या जागेची बांगर यांनी आज पाहणी केली. तसेच या जागेच्या पायलिंगचे काम त्वरित सुरू करावे, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. त्याचप्रमाणे चारकोप येथे लॉन्चिंग शाफ्टची पाहणी केली. लॉन्चिंग शाफ्ट मध्ये सध्या खोदकाम सुरू आहे. जवळपास दहा मीटर पर्यंत खोदकाम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी दररोज 1350 क्युबिक मीटर या गतीने सध्या खोदकाम सुरू आहे.(Mumbai Infrastructure)


या शाफ्टचे काम 31 मार्च 2027  पर्यंत पूर्ण करून 1 एप्रिल 2027 पासून टनेल बोरिंग मशीनची जोडणी आणि 31 मे 2027 रोजी टनेल बोरिंग मशीनने पहिल्या बोगद्याच्या प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात, असे नियोजन आहे. त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणजे 31 जुलै 2027 रोजी दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात केली जाणार आहे. पहिले टनेल मशीन मालाड येथील रिट्रीवल शाफ्ट येथे जुलै 2027 पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. तोपर्यंत मालाड चा रिट्रीवल शाफ्ट पूर्ण होईल, असे नियोजन करून काम करावे असे निर्देश बांगर यांनी दिले.

Comments
Add Comment

कांदिवली डहाणूकरवाडी स्मशानभूमीतील लाकडी दहन सुविधा 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2026 दरम्यान तात्पुरती बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर दक्षिण’ विभागातील कांदिवली येथील डहाणूकरवाडी

Save Mumbai Playgrounds: मुंबईतील मैदाने आणि उद्याने खासगी संस्थांच्या ताब्यात का? पालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनाला सवाल!

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील मैदाने आणि उद्याने खासगी संस्थांच्या ताब्यात का असा सवाल उपस्थित करतमुंबईतील

सौरऊर्जा प्रकल्पांमुळे BMC च्या वीजबिलात 47.73 टक्क्यांची घट, वीज वापरात 12,383 युनिट्सची बचत

मुंबई(विशेष प्रतिनिधी): ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने मुंबई

26/11 च्या जखमा आजही ताज्या! उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला मोठा सवाल

Mumbai 26/11 attack: मुंबई दहशतवादी हल्ल्या 26/11 म्हंटल की ती काळी रात्र आजही डोळ्यासमोरून जात नाही. समुद्रमार्गे आलेल्या 10

26/11 Terrorist Attack: मुंबईला हादरवणारे बॉम्बस्फोट! काळजात धस्स करणाऱ्या 'या' घटना

मुंबई: 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईकर केव्हाच विसरू शकणार नाहीत. मुंबईकरांच्या इतिहासातील हा काळा दिवस होता. 26

26/11 Mumbai Attack: ‘कसाबच्या गोळीने आयुष्य बदललं, दहशतवाद्यांनी कुटुंबच हिरावलं!’ 26/11 हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण; पीडितांचा संघर्ष आजही कायम

मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या या भीषण