Egypt Tanker Fire: इजिप्तची राजधानी कैरोमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कैरोमध्ये भीषण अपघात झाला आहे. इजिप्तमधील महामार्गावर तेलाच्या टँकरने पेट घेतला. इंधनाने भरलेला टँकर उलटल्यामुळे ही मोठी आग लागली. या आगीत महामार्गावरील अनेक वाहनं जळून खाक झाली. या भीषण आगीत 31जणांचा मृत्यू झाला असून, 21 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या तेल टँकरचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि महामार्गावर तो उलटला. इजिप्तची राजधानी असणाऱ्या कैरोच्या रिंग रोडवर हा अपघात घडला. बुधवारी घडलेल्या या अपघाताने परिसरात भीतीचे वाटेवर पसरले.
तेलाच्या टँकरने त्वरित पेट घेतल्याने ही आग वेगाने पसरली. या आगीत जवळची अनेक वाहने जाळून खाक झाली. सदर अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. प्रसंगावधानाचे भान राखल्यामुळे अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमींची अद्याप प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
26/11 च्या जखमा आजही ताज्या! उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला मोठा सवाल
Mumbai 26/11 attack: मुंबई दहशतवादी हल्ल्या 26/11 म्हंटल की ती काळी रात्र आजही डोळ्यासमोरून जात नाही. समुद्रमार्गे आलेल्या 10 दहशतवाद्यांनी संपूर्ण मुंबईला वेठीस ...
हा अपघात कैरोच्या इंबाबा उपनगरातील वराक परिसरात घडला. ही आग गिझाच्या अल-वराक जिल्ह्यात एका बोगद्याच्या वर आग लागली, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. रिंग रोड ग्रेटर कैरोमधील प्रमुख महामार्गांना जोडतो. हा महामार्ग कैरो, गिझा आणि कल्युबिया प्रांतांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या अपघातानंतर बचाव कार्यासाठी 29 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
गिझा प्रांतात असलेल्या वर्राक भागात टँकर पलटल्यानंतर त्यातील ज्वलनशील असलेले इंधन रस्त्यावर पसरलं. त्यानंतर आगीने रस्त्याला चहुबाजूने वेढले आणि आजूबाजूच्या वाहनांना मोठी आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केलं आणि या दुर्घटनेत 25 पेक्षा जास्त कार आणि दुचाकी जळून खाक झाल्या.
कैरोजवळ इंधन टँकर कोसळल्याने लागलेल्या भीषण आगीत किमान 31 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी अनेक लोक जमले होते. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी एक निवेदन जारी करून अपघातात प्राण गमावलेल्यांप्रति शोक व्यक्त केला आहे तसेच पीडितांच्या कुटुंबीयांप्रति सहानुभूती दर्शवली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये महामार्गावर आगीचे मोठे लोळ आणि धुराचे लोट दिसत आहेत.