ढाब्यावर जेवण सुरू असतानाच हल्लेखोर आले आणि... रोहतकमधील गोळीबारामागचे धक्कादायक गुपित काय?

हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील एका ढाब्यावर मध्यरात्री झालेल्या अंदाधुंद गोळीबारात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खरावड पोलिस चौकीपासून अवघ्या काही पावलांवर घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, या हत्याकांडामागे दोन टोळ्यांमधील गँगवॉर असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

मुंबई: हरियाणातील रोहतक जिल्ह्यामध्ये मध्यरात्री घडलेल्या एका रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. बुधवारी (25 नोव्हेंबर) मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास खरावड पोलिस चौकीपासून काही हाकेच्या अंतरावर असलेल्या 'मिलन ढाबा'वर पाच हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करत चार तरुणांची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे ढाब्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये मोठी घबराट उडाली आहे. शिवाय, अनेक नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी खुर्च्या आणि टेबलांचा आधार घेत लपण्याचा प्रयत्न केला.






मिळालेल्या माहितीनुसार, पाचही हल्लेखोर स्विफ्ट कारमधून घटनास्थळी आले होते. त्या वेळी ढाब्यावर काही तरुण जेवण करत होते. हल्लेखोरांनी कोणताही इशारा न देता किंवा कोणतेही संभाषण न करता थेट गोळीबार सुरू केला. अचानक सुरू झालेल्या या गोळीबारामुळे ढाब्यावर ग्राहकांची आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू झाली. या हल्ल्यात तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चौथा तरुण जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तिथून पळत होता, मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्यालाही गोळ्या घालून ठार केले. या संपूर्ण थरारानंतर आरोपी काही मिनिटे घटनास्थळीच शस्त्रे नाचवत फिरत होते आणि त्यानंतर कारमधून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






रोहतक पोलीसांना मृत तरुणांची ओळख पटवण्यासाठी यश मिळाले आहे. मृतांपैकी तिघे जण झज्जर जिल्ह्यातील डीघल गावचे रहिवासी होते, तर चौथा तरुण बेरी परिसरातील असल्याचे समोर आले आहे. रिंकू, विनित आणि गंजू अशी डीघल येथील मृत तरुणांची नावे असून, हिमांशु हा बेरी परिसरातील रहिवासी होता. या घटनेमुळे संबंधित गावांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, या हत्याकांडामागे भाऊ रिटोलिया टोळी आणि सन्नी रिटोलिया टोळी यांच्यातील गँगवॉर कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. शिवाय, डीघल गावात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका तरुणाच्या हत्येशी या घटनेचे धागेदोरे जोडले जात आहेत. मात्र, हत्येचे नेमके कारण काय आणि हल्लेखोर कोण होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.






घटनेची माहिती मिळताच रोहतक पोलीस रेंजचे आयजी हमिद अख्तर मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत पोलिस अधीक्षक गौरव राजपुरोहित आणि जिल्ह्यातील इतर वरिष्ठ पोलिस अधिकारीही उपस्थित होते. सीआयए, स्पेशल सेल आणि न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (एफएसएल) पथकांनी घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. आरोपींची कार आणि ते कोणत्या दिशेने पळून गेले, याचा शोध घेण्यासाठी पोलिस आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके कार्यरत असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.

Comments
Add Comment

'त्या' एका फोटोमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला; रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

मुंबई इंडियन्सने आपल्या आयपीएल 2027  साठीच्या कर्णधाराबद्दल उत्सुकता वाढवली आहे. मुंबई इंडियन्सने बुधवारी

World Heritage Week: लखनऊ राज्य संग्रहालयात जागतिक वारसा सप्ताहाचा समारोप; स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील राज्य संग्रहालयात जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित

'या' रेल्वे शेअरमध्ये तुफान तेजी! एका दिवसात 20% वाढ, गुंतवणूकदारांचे लक्ष

बुधवारी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली असून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशकांनी मोठी उसळी घेतली

Modi cabinet decisions today : मोदी मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय! तब्बल १९,९३४ कोटींची तरतूद; देशांतर्गत उत्पादनाला मिळणार मोठी चालना

विमानतळ, बंदर विस्तार आणि टपाल सेवांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा मंजूर नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi)

Yogi Adityanath : "कमळ हेच आमचे सर्वस्व; मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, हे सर्वांनाच माहीत आहे" : योगी आदित्यनाथ यांचे ठाम वक्तव्य

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून सुरू असलेल्या चर्चांना योगींचे उत्तर उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील पुढील

Flipkart CEO : फ्लिपकार्टचे CEO कल्याण कृष्णमूर्ती पद सोडणार; 11 वर्षांच्या कार्यकाळात कंपनीची पाचपट वाढ

ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कल्याण कृष्णमूर्ती आपल्या पदाचा