Paternity Leave : आता पुरुषांनाही मिळणार 15 दिवसांची पितृत्व रजा! सरकारचा मोठा निर्णय

मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी घेतलेल्या या निर्णयानुसार, विवाहित पुरुष कर्मचारी बाळंतपणाच्या १५ दिवस आधी किंवा बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत ही रजा घेऊ शकणार आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना १५ दिवसांच्या पितृत्व रजेची घोषणा केली आहे. उत्तम पालकत्वासाठी पुरुषांना असा हक्क देण्याची राज्यात ही पहिलीच वेळ आहे. मुलांची काळजी घेणे ही पुरुषांचीही जबाबदारी आणि कर्तव्य आहे आणि त्यानुसार विवाहित पुरुषांना १५ दिवसांची पितृत्व रजा मिळू शकेल, असे सरकारने म्हटले आहे. पुरुषांसाठी नवीन रजा सुविधा लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून ही १५ दिवसांची रजा एकतर बाळंतपणाच्या १५ दिवस आधी किंवा बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत घेता येईल, असे एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.






सरकारने सांगितल्यानुसार पुरुषांना पितृत्व रजेची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवेदनानंतर हा निर्णय घेण्यात आला असून त्यावर सकारात्मक विचार करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकारमध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना सध्या ३६५ दिवसांची प्रसूती रजा दिली जात असताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या विनंतीनंतर सरकारने पुरुष कर्मचाऱ्यांसाठी पितृत्व रजा सुरू केली आहे. महिला सरकारी कर्मचाऱ्यांना ३६५ दिवसांची प्रसूती रजा देण्याची तरतूद ही मातृत्व आणि बालकाच्या कल्याणला दिले जाणारे महत्त्व दर्शवते, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्याचप्रमाणे, पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना पितृत्व रजा दिल्यास त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या वाटून घेण्यास मदत होईल आणि मुलाच्या संगोपनात वडिलांचा सहभाग सुनिश्चित होईल, असेही त्यात नमूद केले आहे.


'या काळात आईला शारीरिक आणि भावनिक आधार देण्यासाठी तसेच बाळाची काळजी घेण्यासाठी वडिलांचा पाठिंबा अत्यावश्यक असतो. पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना पितृत्व रजा दिल्यास कौटुंबिक जबाबदाऱ्या वाटून घेण्यास मदत होईल आणि मुलांच्या संगोपनात वडिलांचा सहभाग सुनिश्चित होईल,' असे मुख्यमंत्री सी जोसेफ म्हणाले.

Comments
Add Comment

Contractual Employees : कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, 10 वर्षांच्या सेवेनंतर कायम नियुक्तीचा मार्ग मोकळा

गोव्यात सलग 10 वर्षे कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत नियमित करण्याच्या

Indian railways AC coach viral video : धावत्या AC कोचमध्ये दिवा आणि शंखनाद; प्रवाशांच्या जीवाशी खेळल्याचा आरोप, रेल्वेकडून सखोल चौकशीची मागणी

मुंबई : चालत्या वातानुकूलित (AC) रेल्वेच्या डब्यात एका प्रवाशाने चक्क दिवा प्रज्वलित करून आणि शंख वाजवून पूजा

जेट एअरवेजच्या माजी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 480 कोटींची ग्रॅच्युइटी आणि पीएफ रक्कम व्याजासह देण्याचे एनसीएलएटीचे आदेश

तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर जेट एअरवेजच्या माजी कर्मचाऱ्यांना मोठा विजय मिळाला आहे.

SBI Clerk Mains 2026 : SBI क्लर्क मुख्य परीक्षा २०२६ सुरू; ९,७६६ पदांसाठी भरती प्रक्रिया, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) 'ज्युनियर असोसिएट' (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) पदासाठीची मुख्य परीक्षा २६ नोव्हेंबर,

'रेड बुक'वरून योगी आदित्यनाथांचा विरोधकांना टोला; संविधान दिनी जोरदार टीका!

Constitution Day 2026: संविधान दिनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्रिमंडळातील

जास्त साखर, मीठ, फॅट असलेल्या पदार्थांच्या पॅकेटवर असणार खास मार्किंग, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्देष

नवी दिल्ली: बाजारपेठेतून चिप्स, बिस्किटे, चॉकलेट किंवा कोणतेही पॅकेज्ड फूड खरेदी करताना अनेकदा पाकिटाच्या मागील