जास्त साखर, मीठ, फॅट असलेल्या पदार्थांच्या पॅकेटवर असणार खास मार्किंग, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्देष

चिप्स, बिस्किटे किंवा इतरत्र पॅकेज्ड फूड खरेदी करताना आता मागे लिहिलेला मजकूर वाचण्याची गरज पडणार नाही. “HIGH FAT”, “HIGH SUGAR” किंवा “HIGH SALT” असलेल्या पदार्थांच्या पाकिटाच्या पुढच्या बाजूला लाल रंगाचा इशारा देणे बंधनकारक करणारा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

बाजारपेठेतून चिप्स, बिस्किटे, चॉकलेट किंवा कोणतेही पॅकेज्ड फूड खरेदी करताना अनेकदा पाकिटाच्या मागील बाजूला बारीक अक्षरात लिहिलेली माहिती असते, ती माहिती वाचणे कठीण जाते. अनेकदा आपण नकळत “HIGH FAT”, “HIGH SUGAR” किंवा “HIGH SALT” असलेले पदार्थ खातो. मात्र, नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, “HIGH FAT”, “HIGH SUGAR” किंवा “HIGH SALT” असलेल्या पॅकेज्ड खाद्यपदार्थांच्या पॅकेटच्या पृष्ठभागावर स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे. संविधानात आरोग्याच्या अधिकाराचा उल्लेख असून, संविधान दिनाच्या निमित्ताने दिलेला हा निर्णय देशाला निरोगी भविष्याकडे नेणारा ठरेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.


(बातमी अपडेट होत आहे)

Comments
Add Comment

Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार! खरेदीचा विचार करताय? आधी आजचे ताजे भाव जाणून घ्या

भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरांकडे सध्या ग्राहकांचे लक्ष लागले आहे. लग्नसराई, सणासुदीचे दिवस किंवा

संविधान दिनाबाबत पंतप्रधान मोदींचा मोठा संदेश; 'विकसित भारत'च्या स्वप्नासाठी संविधानाचा मार्गदर्शक दीप!

नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचा अमूल्य वारसा असलेल्या संविधानाच्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

ढाब्यावर जेवण सुरू असतानाच हल्लेखोर आले आणि... रोहतकमधील गोळीबारामागचे धक्कादायक गुपित काय?

मुंबई: हरियाणातील रोहतक जिल्ह्यामध्ये मध्यरात्री घडलेल्या एका रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला

'त्या' एका फोटोमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला; रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

मुंबई इंडियन्सने आपल्या आयपीएल 2027  साठीच्या कर्णधाराबद्दल उत्सुकता वाढवली आहे. मुंबई इंडियन्सने बुधवारी

World Heritage Week: लखनऊ राज्य संग्रहालयात जागतिक वारसा सप्ताहाचा समारोप; स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील राज्य संग्रहालयात जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित

'या' रेल्वे शेअरमध्ये तुफान तेजी! एका दिवसात 20% वाढ, गुंतवणूकदारांचे लक्ष

बुधवारी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली असून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशकांनी मोठी उसळी घेतली