जेट एअरवेजच्या माजी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 480 कोटींची ग्रॅच्युइटी आणि पीएफ रक्कम व्याजासह देण्याचे एनसीएलएटीचे आदेश

सात वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर जेट एअरवेजच्या माजी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने (NCLAT) पात्र कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि पीएफची थकबाकी व्याजासह पुढील दोन आठवड्यांत देण्याचे आदेश दिले आहेत.

तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर जेट एअरवेजच्या माजी कर्मचाऱ्यांना मोठा विजय मिळाला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने (NCLAT) पात्र माजी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि भविष्य निर्वाह निधीची (PF) थकित रक्कम व्याजासह पुढील दोन आठवड्यांत देण्याचं महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना एकूण सुमारे ४८० कोटी रुपयांची थकबाकी मिळणार आहे.


एप्रिल २०१९ मध्ये आर्थिक संकटामुळे जेट एअरवेजची विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेत गेली आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कंपनीच्या लिक्विडेशनचे आदेश दिले होते. या संपूर्ण काळात हजारो कर्मचाऱ्यांचे वेतन, ग्रॅच्युइटी आणि पीएफचे पैसे अडकून पडले होते. कर्मचारी संघटनांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी सातत्याने कायदेशीर लढा दिला.






ग्रॅच्युइटी आणि पीएफ ही वैधानिक देणी असून ती सामान्य लिक्विडेशन मालमत्तेचा भाग मानली जाऊ शकत नाहीत, असे न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानुसार, राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने आता लिक्विडेटरला ही रक्कम तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार, पात्र कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम व्याजासह थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, तर पीएफची रक्कम पीएफ कार्यालयामार्फत संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल. भारतीय नियमांनुसार किमान पाच वर्षे सेवा पूर्ण केलेले कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेल्या जेट एअरवेजच्या माजी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

SBI Clerk Mains 2026 : SBI क्लर्क मुख्य परीक्षा २०२६ सुरू; ९,७६६ पदांसाठी भरती प्रक्रिया, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) 'ज्युनियर असोसिएट' (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) पदासाठीची मुख्य परीक्षा २६ नोव्हेंबर,

'रेड बुक'वरून योगी आदित्यनाथांचा विरोधकांना टोला; संविधान दिनी जोरदार टीका!

Constitution Day 2026: संविधान दिनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्रिमंडळातील

जास्त साखर, मीठ, फॅट असलेल्या पदार्थांच्या पॅकेटवर असणार खास मार्किंग, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्देष

नवी दिल्ली: बाजारपेठेतून चिप्स, बिस्किटे, चॉकलेट किंवा कोणतेही पॅकेज्ड फूड खरेदी करताना अनेकदा पाकिटाच्या मागील

Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार! खरेदीचा विचार करताय? आधी आजचे ताजे भाव जाणून घ्या

भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरांकडे सध्या ग्राहकांचे लक्ष लागले आहे. लग्नसराई, सणासुदीचे दिवस किंवा

संविधान दिनाबाबत पंतप्रधान मोदींचा मोठा संदेश; 'विकसित भारत'च्या स्वप्नासाठी संविधानाचा मार्गदर्शक दीप!

नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचा अमूल्य वारसा असलेल्या संविधानाच्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

ढाब्यावर जेवण सुरू असतानाच हल्लेखोर आले आणि... रोहतकमधील गोळीबारामागचे धक्कादायक गुपित काय?

मुंबई: हरियाणातील रोहतक जिल्ह्यामध्ये मध्यरात्री घडलेल्या एका रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला