
व्हर्च्युअल Meet & Greet च्या माध्यमातून प्रेक्षकांना आपल्या आवडत्या पात्रासोबत फोटो किंवा सेल्फी काढता येणार असून हा खास क्षण सोशल मीडियावर शेअर करता येणार आहे. स्टार प्रवाह डिजिटल, कलर्स गुजराती डिजिटल, कलर्स मराठी डिजिटल आणि स्टार विजय डिजिटल या प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय पात्रांना या उपक्रमाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधता येणार आहे. या उपक्रमाला टाटा प्लेचीही साथ लाभली आहे.
या उपक्रमाची सुरुवात स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील काव्यासोबत करण्यात आली आहे. काव्यासोबत खास फोटो काढण्याची संधी चाहत्यांना मिळणार असून पुढील टप्प्यांमध्ये आणखी काही पात्रं आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स या उपक्रमाशी जोडले जाणार आहेत.
या उपक्रमाविषयी जिओस्टारच्या प्रवक्त्यांनी सांगितले, “भारतीय घरांमध्ये टेलिव्हिजन हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, तर कुटुंबांना एकत्र आणणारा आणि अनेक भावनिक नाती जोडणारा दुवा आहे. टेलिव्हिजनवरील कथा आणि पात्रं अनेकदा आपल्या घराचा, आपल्या दिनक्रमाचा भाग बनतात. जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त लाखो प्रेक्षकांच्या या प्रेमाचा आणि विश्वासाचा गौरव करण्यासाठी ‘Your Star Moment’ हा आमचा खास प्रयत्न आहे. कंटेंट, तंत्रज्ञान आणि वितरण यांची सांगड घालून प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या पात्रांशी आणखी जवळीक साधता यावी, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. बदलत्या काळानुसार टेलिव्हिजन विकसित होत असताना प्रेक्षकांशी असलेलं हे नातं अधिक दृढ करण्यासाठी आम्ही सातत्याने नवनवीन अनुभव उपलब्ध करून देत आहोत.”
[caption id="attachment_1079450" align="alignnone" width="800"] The Attacks of 26/11 (2013): मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा थरार आणि त्या काळ्या रात्रीच्या घटनांचे चित्रण करणारा चित्रपट म्हणजे द अटॅकस ऑफ 26/11 . ...
जिओस्टार टेलिव्हिजन मनोरंजनाच्या बदलत्या स्वरूपाची या उपक्रमासोबतच, म्हणजेच Linear TV Streaming चीही ओळख करून देत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून लाइव्ह टेलिव्हिजनचा अनुभव देणारी ही सुविधा सेट-टॉप बॉक्स किंवा अतिरिक्त वायरिंगशिवाय प्रेक्षकांना मिळणार आहे. पारंपरिक Pay TV सेवांच्या जोडीने उपलब्ध होणारी ही सेवा आधुनिक जीवनशैली आणि प्रेक्षकांच्या बदलत्या गरजांनुसार टेलिव्हिजन पाहण्याच्या अनुभवात होत असलेल्या परिवर्तनाचे एक प्रतीक असल्याचे बोलले जात आहे.
भारतीय घरांमध्ये टेलिव्हिजनचा एक खास दिनक्रम असतो. संध्याकाळच्या मालिकेची वेळ झाली की घरातील कामांची लगबग सुरू होते, मालिकेचं टायटल सॉंग कानावर पडताच घरातील प्रेक्षक टीव्हीसमोर येतात आणि दुसऱ्या दिवशी त्या मालिकेतील प्रसंग, पात्रं आणि कथा यांची चर्चा रंगते. वर्षानुवर्षं टेलिव्हिजनने केवळ मनोरंजन केलं नाही, तर अनेक नाती जोडली, आठवणी निर्माण केल्या आणि घराघरांत आनंदाचे क्षण दिले. ‘Your Star Moment’ हा उपक्रम याच जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव असून प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या पात्रांसोबत स्वतःचा खास क्षण साकारण्याची संधी देणार आहे.






