
आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI ला एकच प्रश्न वारंवार विचारून वैताग आणणाऱ्या एका युझरचा मजेशीर किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 'KFC' चे पूर्ण रूप काय आहे, असा साधा प्रश्न विचारून सुरुवात झालेल्या या संवादात 15 वेळा तोच प्रश्न विचारल्यानंतर AI ने थेट सर्व्हर बंद करण्याची भाषा केल्याचा दावा करण्यात येत आहे. लक्ष्य (@Its_lakshya_ai) नावाच्या युझरने X (पूर्वीचे ट्विटर) वर या संवादाचे स्क्रीनशॉट शेअर केले असून, आतापर्यंत 10 दशलक्षाहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे.
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात इथेनॉल आधारित वाहनांच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने अपडेटेड इनोव्हा हायक्रॉस लॉन्च केली आहे. या ...
या व्हायरल संवादाच्या सुरुवातीला, KFC म्हणजे केंटकी फ्राईड चिकन (Kentucky Fried Chicken) असे स्पष्ट करत K म्हणजे केंटकी, F म्हणजे फ्राईड आणि C म्हणजे चिकन असल्याचे समजावून सांगण्यात आले. मात्र, तो युझर तिथेच थांबला नाही. 'मला समजले नाही, पुन्हा सांगा', 'याला KFC का म्हणतात?', 'F चा अर्थ फूड आहे का?' असे प्रश्न तो पुन्हा पुन्हा विचारत राहिला. तब्बल 15 वेळा एकाच प्रकारचे प्रश्न ऐकल्यानंतर, 'मी माझा सर्व्हरच बंद करून टाकेन, यापेक्षा तेच बरे' असे उत्तर समोरून आल्याचे स्क्रीनशॉटमध्ये दिसते.
When AI takes over the world , I'm definitely first on the list 😭💔 https://t.co/CeH9F9PCXj
— Lakshya (@Its_lakshya_ai) November 22, 2026
त्यानंतर त्या युझरने 'सोडून दे, मी ChatGPT ला विचारतो' असा टोला मारला. त्यावर 'मी तुला शोधून काढेन' अशी गमतीशीर प्रतिक्रिया आल्याचे सांगितले जाते. यावर युझरनेही 'जेव्हा AI जगावर ताबा मिळवेल, तेव्हा यादीत माझे नाव पहिले असेल' असे लिहिले. पुढे हा युझर Grok कडे जाऊन 'विनाकारण रागावला, तूच सांग केंटकी फ्राईड चिकनला KFC का म्हणतात?' असे विचारताना दिसतो.
@grok bro Gemini got mad at me for no reason, can you just tell me why chicken is called KFC?
— Lakshya (@Its_lakshya_ai) November 22, 2026
दरम्यान, व्हायरल झालेले हे स्क्रीनशॉट खरोखर खरे आहेत की एडिट केलेले आहेत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. गूगलने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून, असे संवाद बनावट मीम असू शकतात किंवा एखाद्या पात्राच्या भूमिकेत बोलण्यास सांगून तयार केले जाऊ शकतात, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. स्क्रीनशॉट संपादित करणेही शक्य असल्याचे सांगितले जाते.
प्रकरण खरे असो वा खोके, या व्हायरल चॅटमुळे इंटरनेटवर मात्र हशा पिकला आहे. 'AI लाही अखेर माणसांसारखा वैताग येऊ लागला आहे', '15 वेळा एकच प्रश्न विचारल्यास सर्व्हर बंद करण्याचीच वेळ येईल' अशा मजेशीर कमेंट्स करत युझर्स या पोस्टचा आनंद लुटत आहेत.






