Thursday, November 26, 2026

Nvidia server supply halt Southeast Asia : दक्षिण-पूर्व आशियातील ४ देशांत 'एनव्हिडिया'कडून सर्व्हर पुरवठ्याला ब्रेक; जेनसन हुआंग पुन्हा CEO पदी परतताच...एआय क्षेत्रात खळबळ

या निर्णयाशी संबंधित तीन सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मात्र, पुरवठ्यावर आणलेली ही बंदी नेमकी किती काळ राहणार किंवा ती कायमची असणार का, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही. आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात एआय तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या प्रगत चिप्स तयार करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये 'एनव्हिडिया'ची गणना होते. त्यामुळे जागतिक तंत्रज्ञान आणि व्यापार क्षेत्रात कंपनीच्या या पावलाकडे अत्यंत महत्त्वाची घटना म्हणून पाहिले जात आहे.

प्रसिद्ध अमेरिकी चिप उत्पादक कंपनी 'एनव्हिडिया'ने (Nvidia) दक्षिण-पूर्व आशियातील चार देशांना होणारा सर्व्हर पुरवठा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशिया या देशांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. याबाबत कंपनीने आपले उत्पादन भागीदार असलेल्या डेल (Dell) आणि सुपरमायक्रो (Supermicro) या कंपन्यांना संबंधित देशांमध्ये सर्व्हर न पाठवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

'फायनान्शियल टाइम्स'च्या अहवालानुसार, या निर्णयाशी संबंधित तीन सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मात्र, पुरवठ्यावर आणलेली ही बंदी नेमकी किती काळ राहणार किंवा ती कायमची असणार का, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही. आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात एआय तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या प्रगत चिप्स तयार करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये 'एनव्हिडिया'ची गणना होते. त्यामुळे जागतिक तंत्रज्ञान आणि व्यापार क्षेत्रात कंपनीच्या या पावलाकडे अत्यंत महत्त्वाची घटना म्हणून पाहिले जात आहे.

अमेरिकेच्या वाढीव टॅरिफ प्रस्तावाला चीनचा प्रतिसाद

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने आयात शुल्क लागू करण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे, त्यावर चीनने सावध आणि संयमी भूमिका घेतली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी स्पष्ट केले की, दोन्ही देशांनी व्यापारविषयक वाद सामोपचाराने आणि संवादातून सोडवले पाहिजेत. यासाठी समानतेची वागणूक, परस्पर आदर आणि दोन्ही देशांच्या फायद्याचा दृष्टिकोन असणे आवश्यक आहे.

गुओ जियाकुन यांनी पुढे असेही म्हटले की, चीनमध्ये गरजेपेक्षा अधिक उत्पादन होत असल्याचा दावा चुकीच्या मुद्द्यांवर आधारित आहे आणि याचा वापर राजकीय डावपेच किंवा दबाव आणण्यासाठी होता कामा नये. दुसरीकडे, अमेरिकी व्यापार प्रतिनिधी कार्यालयाच्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासनाकडून चीन आणि युरोपीय महासंघासह एकूण १४ व्यापारी भागीदार देशांवर पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून नवे टॅरिफ लावण्याची तयारी सुरू आहे. या योजनेनुसार, चीनमधून आयात होणाऱ्या मालावर २० टक्के जादा कर आकारला जाण्याची शक्यता असून, त्यामुळे अमेरिकेत येणाऱ्या चिनी वस्तूंवरील एकूण कर सुमारे ४० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >