Thursday, November 26, 2026

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल, सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

शरद पवार ह्यांची तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची हेल्थ अपडेट लेक सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार ह्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती, खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना दिली आहे. त्यांच्या तब्येतीविषयीची अपडेट त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत माहिती दिली आहे. वडिलांच्या तब्येतीची माहिती कळताच सुप्रिया सुळे बैठकीतून निघून रुग्णालयाकडे रवाना झाल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. (बातमी अपडेट होत आहे..)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >