15 वेळा एकच प्रश्न विचारून AI ला पाडले गोंधळात! सर्व्हर बंद करण्याची धमकी देणारा चॅट व्हायरल

KFC चा अर्थ विचारत एका युझरने 15 वेळा तोच प्रश्न विचारून AI चॅटबॉटशी केलेला मजेशीर संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा स्क्रीनशॉट खरा की बनावट याबाबत चर्चा रंगली असली, तरी नेटकऱ्यांकडून यावर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI ला एकच प्रश्न वारंवार विचारून वैताग आणणाऱ्या एका युझरचा मजेशीर किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. 'KFC' चे पूर्ण रूप काय आहे, असा साधा प्रश्न विचारून सुरुवात झालेल्या या संवादात 15 वेळा तोच प्रश्न विचारल्यानंतर AI ने थेट सर्व्हर बंद करण्याची भाषा केल्याचा दावा करण्यात येत आहे. लक्ष्य (@Its_lakshya_ai) नावाच्या युझरने X (पूर्वीचे ट्विटर) वर या संवादाचे स्क्रीनशॉट शेअर केले असून, आतापर्यंत 10 दशलक्षाहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे.






या व्हायरल संवादाच्या सुरुवातीला, KFC म्हणजे केंटकी फ्राईड चिकन (Kentucky Fried Chicken) असे स्पष्ट करत K म्हणजे केंटकी, F म्हणजे फ्राईड आणि C म्हणजे चिकन असल्याचे समजावून सांगण्यात आले. मात्र, तो युझर तिथेच थांबला नाही. 'मला समजले नाही, पुन्हा सांगा', 'याला KFC का म्हणतात?', 'F चा अर्थ फूड आहे का?' असे प्रश्न तो पुन्हा पुन्हा विचारत राहिला. तब्बल 15 वेळा एकाच प्रकारचे प्रश्न ऐकल्यानंतर, 'मी माझा सर्व्हरच बंद करून टाकेन, यापेक्षा तेच बरे' असे उत्तर समोरून आल्याचे स्क्रीनशॉटमध्ये दिसते.





त्यानंतर त्या युझरने 'सोडून दे, मी ChatGPT ला विचारतो' असा टोला मारला. त्यावर 'मी तुला शोधून काढेन' अशी गमतीशीर प्रतिक्रिया आल्याचे सांगितले जाते. यावर युझरनेही 'जेव्हा AI जगावर ताबा मिळवेल, तेव्हा यादीत माझे नाव पहिले असेल' असे लिहिले. पुढे हा युझर Grok कडे जाऊन 'विनाकारण रागावला, तूच सांग केंटकी फ्राईड चिकनला KFC का म्हणतात?' असे विचारताना दिसतो.





दरम्यान, व्हायरल झालेले हे स्क्रीनशॉट खरोखर खरे आहेत की एडिट केलेले आहेत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. गूगलने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून, असे संवाद बनावट मीम असू शकतात किंवा एखाद्या पात्राच्या भूमिकेत बोलण्यास सांगून तयार केले जाऊ शकतात, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. स्क्रीनशॉट संपादित करणेही शक्य असल्याचे सांगितले जाते.


प्रकरण खरे असो वा खोके, या व्हायरल चॅटमुळे इंटरनेटवर मात्र हशा पिकला आहे. 'AI लाही अखेर माणसांसारखा वैताग येऊ लागला आहे', '15 वेळा एकच प्रश्न विचारल्यास सर्व्हर बंद करण्याचीच वेळ येईल' अशा मजेशीर कमेंट्स करत युझर्स या पोस्टचा आनंद लुटत आहेत.

Comments
Add Comment

Pune Mumbai Highway : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर; 18.40 लाखांचा निधी मंजूर

मुंबई : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातांचे धोके कमी करण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाने महत्त्वाचे

Sunetra Pawar : क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी अन्य संकुलांकडे वळविणार - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

अनुदान मर्यादेबाहेरील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर तातडीने मांडण्याचे आदेश मुंबई : राज्यातील विविध क्रीडा

आता आवडत्या मालिकेतील पात्रासोबत काढा सेल्फी! जिओस्टारचा ‘Your Star Moment’ उपक्रम

Your Star Moment: मालिकांमधील पात्रं ही केवळ पडद्यावरची नसतात, तर ती अनेकदा आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात.

SMAT 2026: क्रिकेटच्या मैदानावर संतापजनक प्रकार! कृणाल पांड्यावर चाहत्याने फेकली बूटं; लाजिरवाण्या प्रसंगाचा VIDEO Viral

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेतील एका प्रकाराने क्रीडावर्तुळात चर्चा रंगली आहे. या स्पर्धेत बडोदा आणि

Navi Mumbai water cut news : नवी मुंबईकरांनो सावधान! उद्या १२ तास पाणी बंद; शनिवारीही कमी दाबाने पाणी!

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील रहिवाशांना उद्या, शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी पाणीटंचाईला सामोरे

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका