मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये खासदार पार्थ पवार यांच्याशी निकटचे संबंध असलेल्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे दिली जात असल्याचे चित्र आहे. पक्षात पाच महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्या अर्जुन मेघे यांची मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पार्थ पवार यांनी मेघे यांना नियुक्तीचे पत्र दिले. यापूर्वी झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांच्या नियुक्त्यांवरून पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. त्यामुळे मेघे यांच्या नियुक्तीमुळे पक्षांतर्गत नाराजी पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे.
अर्जुन मेघे हे भाजप युवा मोर्चाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री दिवंगत दत्ता मेघे यांचे चिरंजीव आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे विदर्भातील नेते आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. त्यानंतर आता त्यांच्याकडे मुंबईतील युवक संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आता आवडत्या मालिकेतील पात्रासोबत काढा सेल्फी! जिओस्टारचा ‘Your Star Moment’ उपक्रम
Your Star Moment: मालिकांमधील पात्रं ही केवळ पडद्यावरची नसतात, तर ती अनेकदा आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. त्यांच्या सुख-दुःखात आपण सहभागी होतो, ...
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने अलीकडेच संघटनात्मक फेरबदल करत आमदार झिशान सिद्दीकी यांची मुंबई विभागाध्यक्षपदी, तर सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली होती. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली होती. देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार्थ पवार आणि पक्षातील अन्य नेत्यांच्या उपस्थितीत दोघांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.
याशिवाय पार्थ पवार यांनी राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष, महाराष्ट्र युवती अध्यक्ष आणि विद्यार्थी अध्यक्षपदांवरही नियुक्त्या केल्या आहेत. त्यानंतर आता मुंबईतील युवक संघटनेची जबाबदारी मेघे यांच्याकडे देण्यात आली आहे. या नियुक्त्यांमध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली होती का, यावरून यापूर्वी नाराजी व्यक्त झाल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे नव्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.