Mumbai Coastal Road: कोस्टल रोडवरील वरळी जेट्टी परिसरात उभारणार हेलिफॅड

पीपीपीवर उभारण्यासाठी रेमंटची निवड; महापालिकेच्या महसूलात दरमहा होणार लाखाेंची वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) वरील, वरळी जेट्टी येथील विद्यमान जेट्टीचा विकास आता विकासासाठी सार्वजनिक खाजगी भागिदारी (पीपीपी) तत्वावर केला जाणार आहे. तसेच याठिकाणी हॅलिपॅडही उभारण्यात येणार आहे. यासाठी रेमंड लिमिटेड यांची निवड करण्यात आली आहे. याठिकाणी लँडींग किंवा टेक-ऑफच्या संख्येची अट न ठेवता, दरमहा एक लाख रुपये ही निश्चित रक्कम महानगरपालिकेला द्यावी लागेल. याशिवाय, हेलिपॅडवरून होणाऱ्या व्यावसायिक हेलिकॉप्टर लँडींगआणि टेक-ऑफमधून दरमहा मिळणाऱ्या महसुलाच्या 50 टक्के रक्कम किंवा चार लाख रुपये यांपैकी जी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे.(Worli Helipad)






मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या (दक्षिण) बांधकामादरम्यान, डिझाइन बिल्ड कंत्राटदारांमार्फत बांधकाम साहित्याच्या वाहतुकीसाठी वरळी डेअरीसमोर एक तात्पुरते धक्का (जेट्टी) बांधण्यात आली होती. या जेट्टीचे रूपांतर आता वैद्यकीय स्थलांतर / आपत्कालीन स्थलांतर, किनारी निगराणी, सराव आणि गस्त घालणे, नैसर्गिक आपत्तींच्या वेळी जनतेला मदत करण्यासाठी, व्हीव्हीआयपी / व्हीआयपींच्या उड्‌डाणांना, सार्वजनिक/शासकीय संस्थांच्या हितासाठी हॅलिफॅडसाठी केले जाणार आहे.(Worli Jetty)


आयआयटी तसेच पवन हंसच्या निष्कर्षांवर आधारित, जेटीचे रूपांतर हेलिपॅड मध्ये करण्याकरिता, सुविधा विकसित करण्यासाठी, देखभाल करण्यासाठी आणि संयोजन करण्यासाठी 'जसे आहे तसे' या तत्त्वावर पीपीपी ऑपरेटरची नियुक्ती करण्याचे ठरले. त्यानुसार , स्वारस्याची अभिव्यक्ती म्हणून मागवण्यात आले. यामध्ये रेमंड लिमिटेडची निवड करण्यात आली आहे. जेट्टीचा विकास, बांधकाम, संचालन व देखभाल आणि आवश्यक त्या मंजू-या संदर्भातील सर्व खर्च रेमंड लिमिटेड यांच्याकडून करण्यात येतील.






रेमंड लिमिटेड यांची वरळी येथील विद्यमान जेट्टीच्या विकासासाठी पीपीपी ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्याकरिता आर्थिक भागिदारी तत्त्वावर ज्यामध्ये परवान्यासाठी वास्तुशास्त्रीय बदल करणे, डीजीसीए परवानाधारक हेलिपॅडसाठी असलेल्या सर्व सुविधा पुरवणे, हेलिपॅडचे अनिवार्य सुरक्षित आणि कार्यक्षम संचालन व करण्यासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समिती अध्यक्षांनी मंजुरी दिल्यामुळे हा प्रस्तावानुसार पुढील कार्यवाही आता केली जाणार आहे. या माध्यमातून महापालिकेच्या महसूलात भर पडणार आहे.(Mumbai Development)

Comments
Add Comment

Mumbai Pollution: विकासकांकडून प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन, स्थायी समितीत तीव्र पडसाद

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत प्रदुषणाची पातळी वाढत असून याबाबत 28 मार्गदर्शक तत्वांची नियमावली बनवण्यात आली.

26/ 11Attack : ‘हा घाबरणारा भारत नाही, दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देणारा भारत’- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण होत असताना, या हल्ल्यात शहीद झालेल्या जवान, पोलीस अधिकारी

AI In Governance: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रशासनात परिवर्तन घडविण्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करून प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्याच्या

Manoj Muntashir: मनोज मुंतशिर यांचा तरुणांना खास संदेश; एआयवरही मांडलं स्पष्ट मत

मुंबई पुस्तक महोत्सवात प्रसिद्ध गीतकार आणि लेखक मनोज मुंतशिर यांनी तरुणांना विचारात खोली आणण्याचा खास संदेश

26/11 Attack : 26/11 च्या हुतात्म्यांना मध्य रेल्वेची श्रद्धांजली; CSMT येथील शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण

मुंबई : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण होत असताना, मध्य रेल्वेने या हल्ल्यात प्राण गमावलेल्या

Mumbai bomb threat news : मुंबईच्या महापौर कार्यालयासह अमिताभ बच्चन यांच्या घराला बॉम्बस्फोटाची धमकी; मेट्रो स्थानकेही लक्ष्य, मुंबई पोलीस हाय अलर्टवर

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांच्या कार्यालयासह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) यांच्या