26/11 Attack : 26/11 च्या हुतात्म्यांना मध्य रेल्वेची श्रद्धांजली; CSMT येथील शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे झालेल्या या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, रेल्वे कर्मचारी आणि निष्पाप प्रवाशांचे मध्य रेल्वेने स्मरण केले.

मुंबई : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण होत असताना, मध्य रेल्वेने या हल्ल्यात प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे झालेल्या या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, रेल्वे कर्मचारी आणि निष्पाप प्रवाशांचे मध्य रेल्वेने स्मरण केले.


26 नोव्हेंबर 2026 रोजी CSMT येथील शहीद स्मारकावर श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त राहुल राज आणि CSMT चे स्टेशन डायरेक्टर चंद्रकांत पगारे यांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी मध्य रेल्वेचे इतर अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.






आरपीएफ श्वान पथक आणि बीडीडीएसची उपस्थिती


या कार्यक्रमात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) श्वान पथकाने आणि बॉम्ब शोधक व निकामी करणाऱ्या पथकाने (BDDS) देखील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आरपीएफ बँडने देशभक्तीपर धून सादर केल्या. या वेळी उपस्थितांनी देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांच्या धैर्याचे आणि त्यागाचे स्मरण केले.



प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्धता


26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांसह सुरक्षा दलातील जवानांनी प्राण गमावले होते. CSMT हे या हल्ल्यातील प्रमुख लक्ष्यांपैकी एक होते. या हल्ल्यातील हुतात्म्यांचे स्मरण करत मध्य रेल्वेने रेल्वे प्रवासी आणि रेल्वे परिसराच्या सुरक्षेसाठी आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली.


 
Comments
Add Comment

Mumbai bomb threat news : मुंबईच्या महापौर कार्यालयासह अमिताभ बच्चन यांच्या घराला बॉम्बस्फोटाची धमकी; मेट्रो स्थानकेही लक्ष्य, मुंबई पोलीस हाय अलर्टवर

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांच्या कार्यालयासह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) यांच्या

26/11 Mumbai Attack: 26/11 हा भारतीय संविधानावरील हल्ला होता!

मुंबई : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण होत असताना, या हल्ल्यातील शहीदांना गेट वे ऑफ इंडिया

मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची पावसाळा पूर्वतयारी बैठक संपन्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आगामी पावसाळा 2027 च्या पार्श्वभूमीवर रस्ते, रेल्वे वाहतुकीच्या अनुषंगाने नागरिकांची

Mumbai Coastal Road: कोस्टल रोड प्रकल्पस्थळांची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या आणि पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक वेगवान

कांदिवली डहाणूकरवाडी स्मशानभूमीतील लाकडी दहन सुविधा 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2026 दरम्यान तात्पुरती बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर दक्षिण’ विभागातील कांदिवली येथील डहाणूकरवाडी

Save Mumbai Playgrounds: मुंबईतील मैदाने आणि उद्याने खासगी संस्थांच्या ताब्यात का? पालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनाला सवाल!

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील मैदाने आणि उद्याने खासगी संस्थांच्या ताब्यात का असा सवाल उपस्थित करतमुंबईतील