Mumbai bomb threat news : मुंबईच्या महापौर कार्यालयासह अमिताभ बच्चन यांच्या घराला बॉम्बस्फोटाची धमकी; मेट्रो स्थानकेही लक्ष्य, मुंबई पोलीस हाय अलर्टवर.

२६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री महापौर कार्यालय आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला. या ई-मेलमध्ये दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी महापौर कार्यालयावर ग्रेनेड हल्ला करण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. तसेच मुंबईतील महत्त्वाची मेट्रो स्थानके आणि अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यालाही लक्ष्य करण्याचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांच्या कार्यालयासह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) यांच्या जुहू येथील 'जलसा' निवासस्थानाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. यासोबतच मुंबईतील मेट्रो स्थानकांवरही आयईडी (IED) स्फोट घडवून आणण्याचा इशारा देणारा ई-मेल प्राप्त झाला असून, या घटनेनंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री महापौर कार्यालय आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला. या ई-मेलमध्ये दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी महापौर कार्यालयावर ग्रेनेड हल्ला करण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. तसेच मुंबईतील महत्त्वाची मेट्रो स्थानके आणि अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यालाही लक्ष्य करण्याचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला आहे.






विशेष म्हणजे, या ई-मेलमध्ये खलिस्तान आणि 'खलिस्तान नॅशनल आर्मी'चा उल्लेख आढळून आला आहे. यापूर्वीच गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याच्या २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या लाइव्ह कॉन्सर्टलाही अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती.


मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनीच हा धमकीचा ई-मेल आल्याने प्रशासनाने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर कार्यालय, मेट्रो स्थानके, अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान आणि महालक्ष्मी रेसकोर्ससह मुंबईतील सर्वच संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, सायबर सेलकडून हा ई-मेल कोठून पाठवण्यात आला याचा कसून तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

26/11 Mumbai Attack: 26/11 हा भारतीय संविधानावरील हल्ला होता!

मुंबई : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण होत असताना, या हल्ल्यातील शहीदांना गेट वे ऑफ इंडिया

मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची पावसाळा पूर्वतयारी बैठक संपन्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आगामी पावसाळा 2027 च्या पार्श्वभूमीवर रस्ते, रेल्वे वाहतुकीच्या अनुषंगाने नागरिकांची

Mumbai Coastal Road: कोस्टल रोड प्रकल्पस्थळांची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या आणि पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक वेगवान

कांदिवली डहाणूकरवाडी स्मशानभूमीतील लाकडी दहन सुविधा 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2026 दरम्यान तात्पुरती बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर दक्षिण’ विभागातील कांदिवली येथील डहाणूकरवाडी

Save Mumbai Playgrounds: मुंबईतील मैदाने आणि उद्याने खासगी संस्थांच्या ताब्यात का? पालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनाला सवाल!

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील मैदाने आणि उद्याने खासगी संस्थांच्या ताब्यात का असा सवाल उपस्थित करतमुंबईतील

सौरऊर्जा प्रकल्पांमुळे BMC च्या वीजबिलात 47.73 टक्क्यांची घट, वीज वापरात 12,383 युनिट्सची बचत

मुंबई(विशेष प्रतिनिधी): ऊर्जा संवर्धन आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने मुंबई