
मुंबई : शिवाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरात झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटनेची उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने (फास्ट ट्रॅक) करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी त्यांनी आढावा बैठक घेतली. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य तीन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.
रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट आणि बिडी ओढण्यास विरोध केल्याने प्रवासी ...
शिवाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरात एका आरोपीवर गोळीबार करून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. या घटनेनंतर पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. विरोधकांनीही शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.(Pune Firing)
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “काही दिवसांपूर्वी दुर्दैवी घटना घडली. त्यासंदर्भात पुण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या गुन्ह्यासंदर्भात तसेच इतर बाबींवर विचारणा केली. सहा आरोपींना पकडण्यात आले असून, आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा तपास जलदगतीने करण्याचे आदेश दिले आहेत.”
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शनपथाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर सलग अडीच महिने भाविकांसाठी ...
दरम्यान, या घटनेवरून सुनेत्रा पवार यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी टीका केली होती. रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्याप्रमाणे काम करता येत नसल्याचे विधान केले होते. तसेच पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कठोर पालकमंत्र्यांची गरज असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी या विधानाबद्दल व्यक्तिगत दिलगिरीही व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांनीही पुण्याचे पालकमंत्रिपद बदलण्याची मागणी केली होती.(Pune Court Attack)






