मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पामधील धारावीमधील दोन ठिकाणच्या बांधकामांमधील बाधित झाडांचे प्रस्ताव वृक्षप्राधिकरणाने मंजूर केले आहे. यामध्ये दोन्ही ठिकाणच्या बांधकामांमध्ये 67 झाडे कापणे आणि 143 झाडे पुनर्रोपित करणे अशाप्रकारे अशाप्रकारे 210 बाधित झाडे काढण्यास वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्यासाठी येथील बांधकामांमध्ये बाधित झाडे हटवण्यासाठी वृक्ष प्राधिकरणापुढे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत इमारतीच्या पुनर्बांधकामानुसार 20 मीटर रुंद रस्त्यांच्या कामात एकूण 75 झाडे बाधित होत आहे. त्यात 14 झाडे कापली जाणार आहेत, तर 61 झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. या बाधित झाडांच्या बदल्यात पालघर जिल्ह्यातील पोचाडे तामसाई येथे 8 हेक्टर जागेत एकूण 961 झाडे लावली जाणार आहेत. याठिकाणी 15 प्रकारची झाडे लावली जाणार आहेत.
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना, 60 वर्षीय महिलेला गर्दुल्यांने मारहाण करत अत्याचार
मुंबई: राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेचे धिंडवडे निघत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मध्य रेल्वेच्या अत्यंत ...
तर धारावी विकास प्रकल्पांतील माटुंगा येथील सेंट्रल रेल्वे वसाहतीतील आर.पी.एफ ग्राऊंड रेल्वे कॉलनी येथील रेल्वे परिचालन सोयीसुविधांच्या पुनर्विकासानुसार वाहन मार्गिकेच्या कामात एकूण 135 बाधित होत आहे. त्यातील 53 झाडे कापणे आणि 82 झाडे पुनर्रोपित केली जाणार आहे. या बाधित झाडांच्या बदल्यात भरपाई म्हणून 2117 झाडे हे 10 हेक्टर जागेत लावले जाणार आहे. ही झाडांच्या बदल्यात पालघर जिल्ह्यातील अक्करपट्टी येथे 15 प्रकारची झाडे लावली जाणार आहेत. हे दोन्ही प्रस्ताव वृक्षप्राधिकरणाचे अध्यक्ष तथा आयुक्त आश्विनी भिडे यांनी मंजूर केले. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रस्ताव मंजूर केल्यानंतर एमआयएमचे विजय उबाळे यांनी आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रस्ताव मंजूर केल्यानंतर पुन्हा त्यावर चर्चा करता येत नसल्याने अध्यक्षांनी मत विचारात न घेतले नाही. त्यामुळे याचा निषेध म्हणून उबाळे यांनी सभात्याग करत असल्याचे सांगत बैठकीतून बाहेर पडले. प्रशासनाच्या नियमानुसार एकदा एखाद्या विषयावर रुलींग दिल्यानंतर पुन्हा त्यावर कोणत्याही सदस्याला मत मांडता येत नाही किंवा आक्षेप नोंदवता येत नाही किंबहुना ते मत विचारात घेता येत नाही.
Bandra Station: वांद्रे स्थानकाला 162 वर्षे पूर्ण; तीन दिवसीय ‘बांद्रा स्टेशन महोत्सव 2026’ ला उत्साहात सुरुवात
Bandra Station: मुंबईच्या ऐतिहासिक वांद्रे रेल्वे स्टेशनने १६२ वर्षांचा टप्पा गाठला आहे. या निमित्ताने पश्चिम रेल्वेच्या मुंबई मंडळाने २७ ते २९ नोव्हेंबर ...
धारावी पुनर्विकास प्रकल्प 20 मीटर रुंद रस्ते कामात बाधित
- वृक्ष कापणे : 14
- पुनर्रोपण करणे : 61
धारावी पुनर्विकास प्रकल्प आर.पी.एफ ग्राऊंड रेल्वे कॉलनी परिसर
- वृक्ष कापणे : 53
- पुनर्रोपण : 82
एकूण कापणे आणि पुनर्रोपित केली जाणारे झाडे
- वृक्ष कापणे : 67
- पुनर्रोपण : 143