
Toyota Innova Hycross: भारतातील पहिली फ्लेक्स-फ्यूएल हायब्रीड कार टोयोटाने, इनोव्हा हायरायडर लॉन्च केली आहे. ही एमपीव्ही E20 पासून E85 पर्यंतच्या कोणत्याही इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालवता येणार आहे. भारतीय वाहन बाजारात पर्यायी इंधनाच्या दिशेने एक पाऊल म्हणून, टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपल्या लोकप्रिय MPV, इनोव्हा हायक्रॉसचे अद्ययावत मॉडेल सादर केले आहे. कारच्या बाह्य आणि अंतर्गत रचनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. मात्र आता ही कार इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालवण्यासाठी टोयोटाने कोणते बदल केले आहेत? जाणून घेऊया.
या कारचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे नवीन फ्लेक्स-फ्यूएल स्ट्रॉंग-हायब्रीड पॉवरट्रेन, ज्यामुळे हे भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेले एकमेव स्ट्रॉंग-हायब्रीड फ्लेक्स-फ्यूएल वाहन ठरले आहे. या कारसोबतच, कंपनीने आपली पहिली फ्लेक्स-फ्यूल हायब्रीड कार आणि देशातील पहिली कार देखील लॉन्च केली आहे. ही कार E85 पेट्रोलवरही चालू शकणार आहे. म्हणजेच हे नवीन इंजिन 85 टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण असलेल्या इंधनावर, चालण्यास पूर्णपणे सक्षम आहे. कंपनीने नवीन इनोव्हा हायक्रॉस ₹19.59 लाख या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केली आहे, तर तिच्या स्ट्रॉंग-हायब्रीड फ्लेक्स-फ्यूएल व्हेरियंट्सची किंमत ₹19.99 लाख ते ₹31.99 लाख दरम्यान आहे.
Delimitation Bill: सरकारने लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आली आहे. सरकारी कामकाज तातडीने करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे, ...
इंजिनमध्ये हार्डवेअर बदल का केले?
केवळ सॉफ्टवेअर किंवा इंधन कॅलिब्रेशन बदलून कोणतेही सामान्य पेट्रोल इंजिन E85 इंधनावर चालवले जाऊ शकत नाही. त्यामुळे E85 पेट्रोलवर इंजिन चालवण्यासाठी अनेक बदल करणे आवश्यक आहे. इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म पेट्रोलपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळे आहेत आणि त्याचा ओलावा शोषण्याचा दर जास्त असतो, ज्यामुळे इंजिनच्या धातूच्या भागांना गंज लागण्याचा धोका वाढतो. म्हणूनच टोयोटाने इंजिनचे दीर्घायुष्य आणि विश्वसनीय कार्यप्रदर्शन सुनिश्चित करण्यासाठी त्याच्या इंधन पुरवठा प्रणाली आणि अंतर्गत हार्डवेअरमध्ये अनेक मोठे तांत्रिक बदल केले आहेत. या बदलांमुळे गाडीचे इंजिन जास्त इथेनॉल मिश्रण असलेल्या पेट्रोलवर चालवता येते. नवी दिल्लीमध्ये E85 पेट्रोल ₹82.12 प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. याचा अर्थ गाडी कमी खर्चात चालवता येऊ शकते.
📍 New Delhi
Launched Toyota Kirloskar Motor’s 1️⃣st Flex Fuel Strong Hybrid Electric Vehicle (FFV-SHEV) in India, the new Innova HyCross, marking a significant milestone in India’s journey towards cleaner, more efficient and sustainable mobility. Combining Flex Fuel and Self-Charging Strong Hybrid Electric technologies, the vehicle enables approximately 60% of drive time and 40% of the distance to be covered in EV mode, enhancing fuel efficiency. This innovative technology offers flexibility in fuel blends, reduces dependence on crude oil and carbon emissions, while supporting farmers’ incomes and strengthening the agro-rural economy. #FlexFuelStrongHybridElectricVehicle #FFV_SHEV — Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 25, 2026
इंजिनमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत?
थंड तापमानात किंवा हिवाळ्यात इंजिन सुरू करण्यास अनेकदा अडचण येते. या समस्येवर उपाय म्हणून, टोयोटाने या इंजिनमध्ये एक नवीन 'मोटर ड्रिव्हन व्हेरिएबल व्हॉल्व्ह टाइमिंग' प्रणाली समाविष्ट केली आहे. हे तंत्रज्ञान कमी तापमानातही इंजिन सहजपणे सुरू होण्यास आणि सुरळीतपणे चालण्यास मदत करते.






