Thursday, November 26, 2026

लोकसभेच्या 543 जागा 850 होणार? डिलिमिटेशन बिलासाठी सरकारची तयारी, राजकीय गणित बदलणार!

सरकारने लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आली आहे. सरकारी कामकाज तातडीने करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे, असे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले आहे. या काळात सरकार मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती सादर केली जाऊ शकते.

Delimitation Bill: सरकारने लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आली आहे. सरकारी कामकाज तातडीने करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे, असे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले आहे. या काळात सरकार मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती सादर केली जाऊ शकते.

उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांची लोकसंख्या वेगाने वाढली आहे. त्यामुळे लोकसभेतील त्यांचे प्रतिनिधित्व वाढू शकते. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दक्षिणेकडील राज्यांचा तुलनात्मक राजकीय प्रभाव कमी होऊ शकतो. उत्तर भारतातील जागांचे प्रमाण वाढल्यास NDA ला अधिक अनुकूल राजकीय संधी मिळू शकते. म्हणजेच लोकसंख्या नियंत्रणात यशस्वी ठरलेल्या राज्यांना राजकीयदृष्ट्या शिक्षा मिळाल्यासारखे होईल.

सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने सोमवार, 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा आणि बुधवार, 2 डिसेंबर रोजी राज्यसभा यांना पुन्हा बोलावण्याची विनंती केली आहे. मात्र, राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की सरकार या काळात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती आणू शकते. तसेच या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे आज या विशेष अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संसदीय समितीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी साडेचार वाजता काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक होणार आहे.

या संभाव्य प्रस्तावामुळे मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेद्वारे लोकसभेच्या सध्याच्या 543 जागा कमाल 850 पर्यंत वाढू शकतात. 2029 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा करणे, हा याचा मुख्य उद्देश असल्याचे मानले जाते.

डिलिमिटेशनसाठी लागणाऱ्या आकड्यांची जुळवाजुळव केंद्र सरकारकडून जवळपास पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट देखील डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, कारण काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत सांगितले होते. तर दुसरीकडे डीएमके देखील या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. प्रत्येक राज्यात 50 टक्के जागा वाढवल्या तर डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करू असं स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.

जर सीमांकन विधेयकावर मतदान झाले, तर ते मंजूर होण्यासाठी सभागृहात दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असेल. लोकसभेत सध्या एकूण 543 जागांपैकी 540 जागा आहेत. त्यामुळे, दोन-तृतीयांश बहुमत, म्हणजेच 360 खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल.

एनडीएमध्ये सध्या 320 खासदार आहेत, ज्यात भाजप (2026 मध्ये नागाव लोकसभा जागा जिंकल्यानंतर 241), एनसीपीआय (20), टीडीपी (16), शिवसेना (13), जेडीयू (12), एलजेपी-राम विलास पार्टी (5), आरएलडी (2), जनसेना पार्टी (2) आणि जेडीएस (2) यांचा समावेश आहे. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस, शिरोमणी अकाली दल, असम गण परिषद (एजीपी), झारखंडची एजेएसयू, अपना दल (सोनेलाल), मांझीचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष), आणि सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (एसकेएम) यांचे प्रत्येकी सात खासदार आहेत. ते जोडून एनडीएची संख्या 320 वर पोहोचली आहे.

लोकसभेत मतदान झाल्यास काय होऊ शकते?

जरी इतर तीन प्रमुख पक्षांचा डीएमके (22), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (8) आणि वायएसआरसीपी (4)  एकूण 34 मतांचा पाठिंबा मिळवला, तरीही एकूण संख्या 354 होईल. याचा अर्थ, सरकारला बहुमत मिळवण्यासाठी अजून सहा मतांची गरज असेल.

पण जर डीएमके तटस्थ राहिली तर बहुमताचा आकडा 345 असेल. या परिस्थितीत, जरी एनडीएला (320) एनसीपी-एसपी (8) आणि वायएसआरसीपी (4) यांचा पाठिंबा मिळाला, तर एकूण संख्या केवळ 332 पर्यंत पोहोचणार, जी बहुमताच्या आकड्यापेक्षा 13 ने कमी असेल.

द्रमुक आणि राष्ट्रवादी काँग्रेस-सपा हे दोन्ही पक्ष जर तटस्थ राहिले तर बहुमताचा आकडा 340 होईल. या समीकरणात, वायएसआरसीपीचा पाठिंबा असूनही, एनडीएला बहुमतासाठी 16 मतांची कमतरता भासेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >