Sunday, November 29, 2026

Kandivali : कांदिवलीतील डॉ.बाबासाहेब रुग्णालयातील साहित्य खरेदीत गैरव्यवहार

खोटे खरेदी आदेश काढून साडेचार कोटींचा दर्शवला गेला खर्च, शिवसेना नगरसेविका डॉ अदिती खुरसुंगे यांनी केला आरोग्य समितीच्या बैठकीत आरोप

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महापालिकेच्या कांदिवलीतील (Kandivali) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालयातील व्यवस्थापनाकडून स्थानिक पातळीवर केल्या जाणाऱ्या खर्चावर शिवसेना नगरसेविकेने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या रुग्णालयातील वस्तूंसाठी तब्बल १६५० खरेदी आदेश बजावून तब्बल साडेचार हजार कोटी रुपयांचा खर्च हा मागील एक वर्षांच्या कालावधीमध्ये करण्यात आल्या आरोपच करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची महापालिका सहआयुक्त (दक्षता) यांची चौकशी समिती गठित करण्याची मागणी शिवसेना नगरसेविका डॉ आरती खुरसुंगे यांनी केला असून याबाबत सार्वजनिक आरोगय समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी याचे चौकशीचे आदेश देतानाच सर्व उपनगरीय रुग्णालयांमध्ये झालेल्या खर्चाचा अहवाल येत्या १५ दिवसांमध्ये सादर करण्याचेही निर्देश दिले.

मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये शिवसेना नगरसेविका डॉ. अदिती खुरसुंगे यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे हा गंभीर आरोप करत याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांपैकी कांदिवली (प.) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे उप वैद्यकीय अधीक्षक यांनी १ एप्रिल २०२५ पासून ते ३१ मार्च २०२६ पर्यंत स्वतःच्या अखत्यारित १६५० पर्चेस ऑर्डर काढलेल्या आहेत. या प्रत्येत पर्चेस ऑर्डरची किंमत प्रत्येकी २५,००० रुपये एवढी आहे.

यामध्ये एका वर्षाची रक्कम रुपये चार ते साडेचार कोटी एवढी होत आहे. या प्रकरणात डॉ. अजय गुप्ता व डॉ. स्वप्नील मोरे यांनी कोणतीही निविदा न काढता त्यांच्या जनरल लेजर (जीएल) मधून १६५० पर्चेस ऑर्डर काढलेल्या आहेत. या पर्चेस ऑर्डर खोटया असून यामध्ये २०टक्के सुद्धा काम झालेले नाही, असाच थेट आरोप केला

या पर्चेस ऑर्डरनुसार पडताळणी केली असता असे दिसून आले की यांत्रिकी व विद्युत विभागामधून या रक्कमेने साहित्य खरेदी करण्यात आलेली नसून राज कॉर्पोरेशन, रोहीत इंजिनिअरींग वर्कस आणि दत्तगुरु इंटरप्रायझेसिंग या कंपन्यांकडून पर्चेस ऑर्डर मंजूर केली जाते. अशाप्रकारे उपनगरीय सर्वसाधारण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन महानगरपालिकेच्या पैशांची लुटमार करत असल्याचा आरोप डॉ खुरसुंगे यांनी केला आहे. या प्रकरणास प्रमुख वैद्यकिय अधीक्षक व खाते प्रमुख व संबंधित खात्याचे महानगरपालिका उपायुक्त जबाबदार असून याप्रकरणी देवेंदर सिंह, महानगरपालिका सह आयुक्त (दक्षता) यांच्या अखत्यारित स्वतंत्र दक्षता समिती नियुक्त करुन, या प्रकरणाची सखोल चौकशी करुन खुलासा सत्य परिस्थिती समोर आणली जावी आणि तोपर्यंत , तोपर्यंत उप वैद्यकीय अधीक्षक, डॉ. अजय गुप्ता यांची बदली करण्यात यावी अशी मागणी त्यांनी समितीच्या बैठकीत केली. यावर अध्यक्षांनी ही बाब गंभीर असून ही बाब केवळ एका कांदिवलीतील महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील खरेदी आणि खर्चाबाबतची आहे. असेच प्रकार इतरही १५ उपनगरीय रुग्णालयांमध्ये सुरु असून यासर्व उपनगरीय रुग्णालयांमध्ये मागील वर्षभरात जे काही खरेदी आदेश काढण्यात आले, तसेच वस्तू तथा साहित्यांची खरेदी करण्यात आली आहे, त्यावरील खर्चाची माहिती पुढील १५ दिवसांमध्ये सादर करण्यात यावा असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच याप्रकरणी चौकशी करण्यासाठी दक्षता समिती गठित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >