Delimitation Bill : डिलिमिटेशनला शरद पवार, एम. के. स्टॅलिन यांचाही पाठिंबा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्वागत
Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षण ही विधेयके देशाच्या विकासासाठी तसेच लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाची आहेत. या ...
12 जानेवारी ते 25 फेब्रुवारीदरम्यान महाशिबिर
हरिद्वार कुंभमेळ्याच्या काळात 12 जानेवारी ते 25 फेब्रुवारी या 45 दिवसांच्या कालावधीत हे महाशिबिर होणार आहे. यामध्ये भाविकांची मोफत नेत्रतपासणी केली जाणार असून, गरजूंना 1 लाख चष्म्यांचे वाटप करण्यात येईल. तसेच 10 हजार नेत्रशस्त्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. शिबिरात आवश्यक औषधेही विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ( Haridwar Kumbh 2027)
‘नेत्र कुंभ’च्या आयोजनासाठी ‘सक्षम’ आणि सहभागी संस्थांनी केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री धामी यांनी कौतुक केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य सरकार आणि कुंभमेळा प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
आर्थिक अडचणीतील नागरिकांना मोफत उपचार
अनेक नागरिक आर्थिक अडचणी किंवा वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे वेळेवर डोळ्यांची तपासणी आणि उपचार करून घेऊ शकत नाहीत. अशा नागरिकांपर्यंत मोफत नेत्रसेवा पोहोचवणे महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. योग्य उपचारांमुळे दृष्टी सुधारण्यासोबतच व्यक्तीचा आत्मविश्वास आणि स्वावलंबनही वाढते, असे त्यांनी नमूद केले.
2019 मध्ये प्रयागराज कुंभातून सुरुवात
‘नेत्र कुंभ’ या उपक्रमाची सुरुवात 2019 मध्ये प्रयागराज कुंभमेळ्यात झाली होती. त्यानंतर हरिद्वार कुंभ, प्रयागराज महाकुंभ आणि राजस्थानमधील रामदेवरा येथेही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमधून लाखो नागरिकांची मोफत नेत्रतपासणी आणि हजारो शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
आगामी हरिद्वार कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. कुंभमेळा भव्य, सुरक्षित आणि सुविधायुक्त व्हावा यासाठी राज्य सरकार काम करत असल्याचे धामी यांनी सांगितले. या सेवा उपक्रमात सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला उत्तराखंडचे आरोग्यमंत्री सुबोध उनियाल, हंस फाउंडेशनच्या संस्थापक माता मंगला, ‘सक्षम’चे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.