Home देश अजमेर-सियालदाह एक्स्प्रेसला अपघात

अजमेर-सियालदाह एक्स्प्रेसला अपघात

0

अजमेर-सियालदाह एक्सप्रेसचे पंधरा डबे रूळावरून घसरून झालेल्या अपघातात २ प्रवासी ठार तर ६४ हून अधिक जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी कानपूरनजीक रूरा रेल्वेस्थानकाजवळ घडली.

कानपूर- अजमेर-सियालदाह एक्सप्रेसचे पंधरा डबे रूळावरून घसरून झालेल्या अपघातात २ प्रवासी ठार तर ६४ हून अधिक जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी कानपूरनजीक रूरा रेल्वेस्थानकाजवळ घडली.

बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास रूरा रेल्वे स्थानकाजवळ अजमेर-सियालदाह एक्स्प्रेस आली असता तिचे डबे घसरले. पूल पार करतानाच ही घटना घडल्याने काही डबे कालव्यात पडल्याचे उत्तर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अमित मालविया यांनी सांगितले.

१३ स्लीपर आणि दोन जनरल डबे रूळावरून घसरल्याची माहिती कानपूरचे पोलीस महानिरीक्षक झाकी अहमद यांनी दिली. या घटनेनंतर घटनास्थळी मोठय़ा प्रमाणावर बचावकार्य करण्यात आले आहे.

या दुर्घटनेमुळे दिल्ली-हावडा वाया कानपूर मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता. तर दिल्ली ते कानपूरमार्गे धावणारी शताब्दी एक्स्प्रेसही रद्द करण्यात आल्याचे मालवीय यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version