Home महाराष्ट्र कोकण अपंग अल्पवयीन युवतीवर सामूहिक बलात्कार

अपंग अल्पवयीन युवतीवर सामूहिक बलात्कार

1

रत्नागिरी शहरानजीक फणसोप येथे अल्पवयीन अपंग युवतीवर सहा नराधमांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. 
रत्नागिरी- रत्नागिरी शहरानजीक फणसोप येथे अल्पवयीन अपंग युवतीवर सहा नराधमांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. वडिलांना व भावाला ठार मारण्याची धमकी देत मागील वर्षभर हा प्रकार सुरू होता. पीडित युवती चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली. शहर पोलिसांनी या प्रकरणातील सहाही संशयित आरोपींना अटक केली आहे.

या बलात्कार प्रकरणी शहर पोलिसांनी दीपक वासुदेव बोरकर (४४), सचिन वासुदेव बोरकर (३५), पप्या ऊर्फ प्रसाद बळवंत फडणवीस (३८), राजू ऊर्फ शशिकांत अनंत पवार (३३), चंदन वसंत शिंदे (२३) आणि योगेश संजय मुरकर (२७, सर्व राहणार मागलाड, फणसोप) या सहा संशयित आरोपींना मंगळवारी रात्री अटक केली आहे. या सहा जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

पीडित तरुणीच्या आईचा मृत्यू झाला असून ती वडील आणि भावासह फणसोप येथे राहते. वरील सहा जणांनी वडील आणि भावाला ठार मारण्याची धमकी देत २०१२ पासून अनेक वेळा ठिकठिकाणी बलात्कार केला. वडिलांना व भावाला ठार मारण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन युवतीने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. मात्र युवती चार महिन्यांची गर्भवती राहिल्याने ही बाब उजेडात आली. या प्रकरणी पीडित युवतीच्या नातेवाइकांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

1 COMMENT

  1. Haya sarva harakhorana FANSI lawkar daya, naytar ashe ankhi prakar wadat jatil, I would like to request indian govt to make strong law against such crimes,
    I am very sorry for the girl & her family members, but her brother should have some gutts to take action at least against one culprit.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version