Home टॉप स्टोरी अमेरिकेत कोलोरॅडोमध्ये गोळीबार तीन ठार, नऊ जखमी

अमेरिकेत कोलोरॅडोमध्ये गोळीबार तीन ठार, नऊ जखमी

0

अमेरिकेतील कोलोरॅडो येथील प्रसूती उपचार केंद्रामध्ये शुक्रवारी एका बंदुकधा-याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तीन जण ठार झाले असून, नऊ जण जखमी झाले आहेत.

न्यूयॉर्क – अमेरिकेतील कोलोरॅडो येथील प्रसूती उपचार केंद्रामध्ये शुक्रवारी एका बंदुकधा-याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तीन जण ठार झाले असून, नऊ जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये पोलिस अधिक-याचा समावेश असून, दोन नागरीकही गोळीबारात ठार झाले. पाच तास सुरु असलेल्या चकमकीनंतर अमेरिकन पोलिसांनी या हल्लेखोराला अटक केली. नऊ जखमींमध्ये पाच पोलिस अधिकारी आहेत.

हल्लेखोराचा नेमका उद्देश काय होता किंवा त्याचा या प्रसूती उपचार केंद्राशी काही संबंध आहे का ? ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकन पोलिस आणि हल्लेखोरांमध्ये पाच तास चकमक सुरु होती. चकमक सुरु असतानाच एकाबाजूने पोलिस ओरडून त्याला गोळीबार थांबवण्याचे आवाहन करत होते. अखेर हल्लेखोराने बंदूक टाकली व तो पोलिसांना शरण आला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version