Home टॉप स्टोरी लोकलमधल्या गर्दीने घेतला २१ वर्षीय तरुणाचा बळी

लोकलमधल्या गर्दीने घेतला २१ वर्षीय तरुणाचा बळी

1
संग्रहित छायाचित्र

मुंबईत लोकलमधून गर्दीच्यावेळी प्रवास जीवघेणा बनत चालला आहे. शुक्रवारी अशाच प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकलमधून प्रवास करताना डोंबिवलीजवळ भावेश नकाते या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

संग्रहित छायाचित्र

ठाणे – मुंबईत लोकलमधून गर्दीच्यावेळी प्रवास जीवघेणा बनत चालला आहे. शुक्रवारी अशाच प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकलमधून प्रवास करताना डोंबिवलीजवळ भावेश नकाते या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

भावेशने सकाळी कामावर जाण्यासाठी निघाला होता. सकाळी साडेआठच्या सुमारास तो डोंबिवली स्थानकात कर्जतहून आलेल्या सीएसटी लोकलमध्ये चढला. मात्र डब्बा प्रवाशांनी खच्चून भरलेला असल्यामुळे त्याला आतमध्ये शिरता येत नव्हते. तो दरवाजावरच्या खांबला पकडून लटकत होता.

तो आत शिरण्याचा प्रयत्न करता होता. मात्र प्रचंड गर्दीमुळे डब्ब्यात रेटारेटी सुरु होती. अखेर या रेटारेटीमध्ये कोपर-दिवा स्थानकादरम्यान त्याचा हात सुटला आणि तो चालत्या लोकलमधून खाली पडला.

रेल्वे पोलिसांनी भावेशला डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. पण तो पर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या भीषण घटनेचे लोकलमधील एका प्रवाशाच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डींग झाले आहे. वृत्तवाहिन्यांवर या अपघाताची चित्रफित पाहिल्यानंतर गर्दीच्यावेळी लाखो प्रवासी कसे जीवावर उदार होऊन प्रवास करतात ते दिसते.

1 COMMENT

  1. जेष्ट नागरिकांना आरक्षण शिट ठेवणाऱ्या न्यायाधीशाला लोकलची गर्दी काय समजणार. सामान्य जनतेकडून कर रूपाने जमा केलेल्या पैशाचा पगार घेवून जनतेच्या विरोधात निर्णय देणारे न्यायाधीश फ़क़्त भारतात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version