Home महाराष्ट्र कोकण अयोध्येतील राममंदिर २०२० साली पूर्ण होणार

अयोध्येतील राममंदिर २०२० साली पूर्ण होणार

1

अयोध्या येथील श्रीरामंदिराबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असली तरी या प्रकरणाचा निकाल हा आपल्याच बाजूने लागेल व येत्या २०२० साली अयोध्या येथे श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर उभे राहणार यात तीळमात्र शंका नसल्याचा विश्वास विश्व हिंदू परिषदेचे सहसंघटन मंत्री विनायकराव देशपांडे यांनी पेण येथे व्यक्त केला.

वडखळ –  अयोध्या येथील श्रीरामंदिराबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असली तरी या प्रकरणाचा निकाल हा आपल्याच बाजूने लागेल व येत्या २०२० साली अयोध्या येथे श्रीरामाचे भव्य दिव्य मंदिर उभे राहणार यात तीळमात्र शंका नसल्याचा विश्वास विश्व हिंदू परिषदेचे सहसंघटन मंत्री विनायकराव देशपांडे यांनी पेण येथे व्यक्त केला. विहिंपच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पेण येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कुलाबा जिल्हामंत्री रमेश मोगरे, पेण प्रखंडाचे अध्यक्ष जयवंत मढवी, रा. स्व. संघाचे विभागीय कार्यवाह वाय. के. पाटील विहिंपचे विभागीय मंत्री सुरेश गोखले, माजी जिल्हा मंत्री वासंती देव यांच्यासह पेण प्रखंडातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच पेणकर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना विनायकराव देशपांडे म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या उपदेशाचे पालन करू या. हिंदूंचे जे स्वप्न आहे ते लवकरच साकार होणार आहे. आज सर्वत्र पाहिले तर हिंदूंना चिडवण्यासाठी गोवंश हत्या केली जात आहे. ५० लाख लोकांचे दुस-या धर्मात होणारे धर्मातरण थांबवण्याचे काम विहिंपने केले आहे. लवजिहाद, रामसेतू, रामजन्म भूमीचा लढा यांसारख्या अनेक आंदोलनात विहिंपने सक्रिय सहभाग दाखवला. तसेच विहिंपच्या कार्यात सर्व जनतेने सहभागी होऊन उद्याचा बलशाली भारत बनवण्यासाठी सर्वानी एक होऊन काम करू या असे आवाहन विनायकराव देशपांडे यांनी पेण येथे केले. यावेळी पेण प्रखंडाची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली.

1 COMMENT

  1. २०२० साली राम मंदिर होणार याचा अर्थ २०१९ सालच्या निवडणुकीसाठी एक मुद्दा तयार . उत्तर प्रदेशात व केंद्रात भाजप चे सरकार प्रचंड बहुमताने आहे मग आताच राम मंदिराचे काम सुरु का करत नाही ? २०१९ मध्ये परत निवडून येण्याची काय गॅरंटी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version