Home टॉप स्टोरी इराकमध्ये गेलेला कल्याणचा तरुण परतला

इराकमध्ये गेलेला कल्याणचा तरुण परतला

0

इसिस या दहशतवादी संघटनेकडून लढण्यासाठी इराकमध्ये गेलेला कल्याणचा आरिफ माजिद हा युवक शुक्रवारी भारतात परतला.

मुंबई -इसिस या दहशतवादी संघटनेकडून लढण्यासाठी इराकमध्ये गेलेला कल्याणचा आरिफ माजिद हा युवक शुक्रवारी भारतात परतला. तुर्कीहून तो सकाळी मुंबईत परतला.

इसिस मध्ये सहभागी होण्यासाठी कल्याणमधील आरिफ इजाज माजिद, सईम फारूख तानकी, फहाद तन्वीर आणि अमन नईम तांडेल हे चार तरुण इराकमध्ये गेले होते.

दरम्यान, इराकमधील हवाई हल्ल्यात आरिफचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर आरिफने आपल्या वडिलांना फोन करुन आपण तुर्कीत असल्याचे सांगितले. इसिससोबत तीन महिने काम केल्यानंतर आपण तुर्की येथे पळून आल्याचे त्याने वडिलांना सांगितले. त्यानंतर लगेचच  आरिफचा फोन आल्याची माहिती आरिफचे वडील जियाझ यांनी २५ नोव्हेंबरला राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिली होती.

आरिब तुर्कीला कसा पळून गेला, इसिसच्या तावडीतून पळ काढण्यात त्याला कसे यश मिळाले याबाबतची कोणतीही माहिती मिळालेली नाही. तुर्कीहून सकाळी ५.१५ मिनिटांनी आरिब मुंबई विमानतळावर दाखल झाला. त्यानंतर तातडीने एनआयएच्या अधिका-यांनी त्याला ताब्यात घेतले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version