Home मनोरंजन बोल्ड दृश्यांना रविनाचा नकार

बोल्ड दृश्यांना रविनाचा नकार

1

‘टिप टिप बरसा पानी…’ गाण्यातून आणि ‘अग्निवर्षा’ या चित्रपटातून आपला बोल्डनेस दाखवणारी बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन लवकरच प्रेक्षकांना पुन्हा हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.
‘टिप टिप बरसा पानी…’ गाण्यातून आणि ‘अग्निवर्षा’ या चित्रपटातून आपला बोल्डनेस दाखवणारी बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन लवकरच प्रेक्षकांना पुन्हा हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.

रविनाची हिंदी चित्रपटांमध्ये ही दुसरी इनिंग असून, तिने चित्रपट स्वीकारताना अंगप्रदर्शन, बोल्ड दृश्यांना स्पष्टपणे नकार दिला आहे.

एका मुलाखतीत रविनाला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर तिने सांगितले की, माझा नवरा आर्थिकदृष्टया सक्षम आहे. मला चित्रपटात काम करण्याची आवश्यकता नाही. पैशांसाठी एका स्टुडिओमधून दुस-या स्टुडिओमध्ये पळण्यापेक्षा मी घरी राहून माझ्या मुलाचा सांभाळ करेन. आता रविनाकडे वेळ असल्याने ती निवडक चांगल्या भूमिका असणारे चित्रपट स्वीकारणार असल्याचे तिने सांगितले.

रविना लवकरच अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटात दिसणार आहे. त्यानंतर ती ओनीर शाबच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा प्रस्ताव रविनाला दहावर्षांपूर्वी देण्यात आला होता. मात्र गर्भवती असल्याने त्यावेळी तिने नकार दिला होता.

ओनीरचा हा चित्रपट आधी संगीत बिजलानी करणार होती. मात्र बोल्ड दृश्यांमुळे संगीताने नकार दिला म्हणून तिच्या जागी रविनाची निवड झाल्याची चर्चा होती.

याबद्दल रविनाला विचारल्यावर ती म्हणाली की, मीच या चित्रपटासाठी पहिली पसंती होती. प्रणय दृश्ये करणार का ? यावर ती म्हणाली की, या चित्रपटात असे कुठलेही प्रणय दृश्य नाही. ओनीरने माझ्यासाठी पुन्हा या चित्रपटाची पटकथा लिहीली आहे. ओनीरने मला चुंबन दृश्याबद्दल विचारले होते. मात्र मी त्याला स्पष्टपणे नकार दिला. कारर्कीद ऐन भरात असताना अशी दृश्ये मी कधी केली नाहीत मग आता का करु ?

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version