Home महामुंबई ठाणे उल्हासनगरात ९ लाख ४१ हजारांचा गुटखा जप्त

उल्हासनगरात ९ लाख ४१ हजारांचा गुटखा जप्त

0
संग्रहित छायाचित्र

दोनच दिवसांपूर्वी ठाणे येथील अन्नसुरक्षा अधिका-यांच्या पथकाने उल्हासनगर व विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी छापा टाकून गुटख्याचा साठा जप्त करून दोघांना अटक केली होती.

संग्रहित छायाचित्र

उल्हासनगर – दोनच दिवसांपूर्वी ठाणे येथील अन्नसुरक्षा अधिका-यांच्या पथकाने उल्हासनगर व विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी छापा टाकून गुटख्याचा साठा जप्त करून दोघांना अटक केली होती.

ही घटना ताजी असतानाच, पुन्हा उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीच्या तळमजल्याच्या खोलीत छापा टाकून ९ लाख ४१ हजार ४०० रुपयांचा गोवा गुटख्याचा साठा जप्त करण्याची कामगिरी अन्नसुरक्षा विभागाच्या अधिका-यांनी केली आहे.

उल्हासनगर कॅम्प-१ येथील शहाड गावठाण, पाण्याच्या टाकीजवळ, पांडुरंग पाटील यांच्या इमारतीच्या तळमजल्यावर गोळय़ा-बिस्कीटची विक्री करणारा दुकानदार बंटी सतानी (३०) याने एका खोलीत राज कोल्हापुरी गुटखा, गोवा गुटखा, गोवा पानमसाला, गोवा सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला, व्ही.आय. सुंगधी तंबाखू, विराज तंबाखू असा साठा करून ठेवल्याची माहिती अन्नसुरक्षा विभाग ठाण्याचे अन्नसुरक्षा अधिकारी व्ही. एच. चव्हाण यांना मिळाली होती.

त्यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कड यांच्या पोलिस पथकासह गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास छापा टाकला व या ठिकाणाहून ९ लाख ४१ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा, तंबाखू, पानमसाला असा साठा जप्त केला. या प्रकरणी दुकानदार बंटी सतानी याच्यासह राज कोल्हापुरी गुटखा, गोवा गुटखा, गोवा पानमसाला, गोवा सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला, व्ही. आय. सुंगधी तंबाखू, विराज तंबाखूचे उत्पादक अशा सात जणांविरोधात उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version