Home महामुंबई ठाणे ऐरोलीत शिवसेनेचे पैसा फेको

ऐरोलीत शिवसेनेचे पैसा फेको

0

प्रचार थंडावल्यानंतर काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून छुपा प्रचार सुरू असून पोलिसानी हा प्रयत्न हाणून पडला. 

नवी मुंबई – प्रचार थंडावल्यानंतर काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून छुपा प्रचार सुरू असून पोलिसानी हा प्रयत्न हाणून पडला. बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात शिवसेनेमधून हकालपट्टी केलेले उपशहरप्रमुख रामदास पवळे यांनी थेट शिवसेना नेतृत्वावर टीकेची झोड उठवत सेनेचा कारभार चव्हाटय़ावर आणला.

ऐरोलीत शिवसेनेच्या एका पदाधिका-याला पैसे वाटप करताना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर जुहूगाव येथे शिवसेना उमेदवाराची प्रचारपत्रके वाटप करताना वाशी पोलिसांनी शिवसनिकांना ताब्यात घेऊन हजारो पत्रके जप्त केली.

ऐरोलीत राष्ट्रवादीचे नगरसेवक एम. के. मढवी यांनी एका व्यापा-याला मारहाण केल्याने काही तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी या घटनेची कोणतीही नोंद पोलिस ठाण्यात झाली नसल्याचे सांगितले.

शिवसेनेतून हकालपट्टी झालेले उपशहरप्रमुख रामदास पवळे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. भाऊ नावाच्या एका नेत्यामुळे शिक्षण मंडळासाठी सदस्य म्हणून निवड झाली असताना अचानक हे पद भाजपच्या घरत यांना देण्यात आले.

ऐरोलीतील शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले यांनी शिवसनिकांच्या बैठकीस विरोध केला. अंतिम टप्प्यात शिवसेनेतील वाद उफाळून आल्याने आता कोपरखैरणे परिसरातील शिवसनिकांत नाराजी पसरली आहे.
पवळे यांनी बंडखोरी करणा-या भाजप उमेदवार वैभव नाईक यांना मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत चौगुले यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी माघार घ्यायला लावल्याचा आरोप पवळे यांनी केला आहे. शिवसेनेविरोधात भूमिका घेणा-यांना मानसन्मान दिला जात आहे. मात्र पक्षासाठी झटणा-या सनिकांची हकालपट्टी केली जात असली तरी आपण गद्दारी करणार नाही, असे पवळे यांचे मत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version