Home महामुंबई काँग्रेस के लिए पाताल से नारायण आये हैं

काँग्रेस के लिए पाताल से नारायण आये हैं

0

‘‘ओ कहते हैं दिल्ली मैं नरेंद्र है, महाराष्ट्र मैं देवेंद्र हैं लेकिन मैं कहता हूँ.. अब रुख जाईए यहा काँग्रेस के लिए पाताल से नारायण आयें है…

मुंबई- ‘‘ओ कहते हैं दिल्ली मैं नरेंद्र है, महाराष्ट्र मैं देवेंद्र हैं लेकिन मैं कहता हूँ.. अब रुख जाईए यहा काँग्रेस के लिए पाताल से नारायण आयें है। नारायण राणेजी का विजय काँग्रेस को नवसंजीवनी देगा।’’ असे काँग्रेसचे खासदार तथा सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते राज बब्बर यांनी सांगितले तेव्हा टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला. बब्बर पुढे म्हणाले, जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा तेव्हा नारायणाचे नाव घेतले जाते.

नारायण साक्षात विष्णूचे रूप आहे. जेव्हा बदल अपेक्षित असतो तेव्हा नारायणाचे नाव घेऊन पुढे जायला हवे. इथे आपल्यासोबत राणे यांच्यासारखे खंबीर उमेदवार आहेत. विजय आपलाच असेल, असा विश्वास बब्बर यांनी व्यक्तकेला. खेरवाडी मतदारसंघाशी माझे जुने नाते आहे. स्वर्गीय सुनील दत्त यांच्यासोबत मी येथे अनेकदा आलो आहे, असे सांगून ते म्हणाले की, येथील स्थानिकांच्या अनेक समस्या आहेत. अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. मात्र आता येथील लोकांना मोठी संधी चालून आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीमुळे येथील लोकांना अभ्यासू आणि खंबीर नेता मिळाला आहे.

केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकारमुळे जनता हैराण झाली आहे. अशा वेळी चक्क पाताळातून नारायण अवतरला आहे. जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा प्रथम नारायणाचे नाव घेतले जाते. नारायण प्रकट होतो आणि आपले विघ्न दूर करतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची उमेदवारी खेरवाडीतील जनतेची संकटे दूर करण्यासाठीच आहे. तेव्हा नारायणाचे नाव घ्या आणि बिनधास्त मार्गस्थ व्हा, विजय आपलाच आहे, असे राज बब्बर म्हणाले. या वेळी बब्बर यांच्या भाषणावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून नारायण राणे यांचा विजय असो, अशा जोरदार घोषणा दिल्या.

[EPSB]

शुभशकुनाच्या प्रचंड सभेने वांद्रे काँग्रेसमय »

वांद्रे पूर्व पोटनिवडणूक काँग्रेसच्या मुख्य प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाची शुभशकुनाची प्रचंड जाहीरसभा खेरवाडी येथे दणक्यात झाली.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version