Home टॉप स्टोरी शुभशकुनाच्या प्रचंड सभेने वांद्रे काँग्रेसमय

शुभशकुनाच्या प्रचंड सभेने वांद्रे काँग्रेसमय

1

वांद्रे पूर्व पोटनिवडणूक काँग्रेसच्या मुख्य प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाची शुभशकुनाची प्रचंड जाहीरसभा खेरवाडी येथे दणक्यात झाली.

मुंबई- वांद्रे पूर्व पोटनिवडणूक काँग्रेसच्या मुख्य प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाची शुभशकुनाची प्रचंड जाहीरसभा खेरवाडी येथे झाली. रणरणत्या उन्हात हजारो कार्यकर्ते, महिलांसह समाजाच्या सर्व घटकातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांतील उत्साहाने हवा बदलाची सुरुवात झाली. ‘मला एक संधी द्या, तुमच्या जीवनात मी परिवर्तन करून दाखवतो’, असा विश्वास नारायण राणे यांनी येथील जनतेला देताच जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी टाळय़ांचा प्रचंड कडकडाट केला. पहिल्याच सभेने वांद्रे पूर्वचे संपूर्ण वातावरण काँग्रेसमय झाले.

‘एमआयएम म्हणजे अल्पसंख्याक मतांचे विभाजन होऊन त्याचा लाभ आपल्याला मिळावा यासाठी भाजपाने निर्माण केलेले पिल्लू आहे. मागच्या निवडणुकीत हे पिल्लू नसते तर काँग्रेसचे अनेक खासदार निवडून आले असते. आता मला खबर मिळाली आहे की, हैदराबादवरून काही लोक आले आहेत. इथे गडबड करण्याचा त्यांचा विचार आहे. मात्र मी इथे सांगू इच्छितो, आम्ही इथे सर्वधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहोत. शेपटीवर पाय देऊ नका. बाहेरून येऊन मस्ती कराल तर ती खपवून घेतली जाणार नाही’, असा खणखणीत इशारा माजी मुख्यमंत्री तथा वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नारायण राणे यांनी एमआयएमला दिला.

वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नारायण राणे यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, हजारो कार्यकर्ते आणि मतदारांच्या उपस्थितीत झाले. रणरणत्या उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नारायण राणे यांच्यासारखे धडाडीचे नेतृत्व आपल्याला मिळत असल्याचा आनंद जमलेल्या मतदारांच्या चेह-यावर दिसत होता. यावेळी बोलताना राणे यांनी येथील लोकांच्या मूलभूत प्रश्नालाच हात घातला. ते म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मला वांद्रे पूर्व विभागातून उमेदवारी दिल्यानंतर मी या भागाचा दौरा केला आहे. कालच बेहरामपाडा पाहिला. तो पाहत असताना मला प्रश्न पडला बेहरामपाडा मुंबईत आहे. मात्र बेहरामपाडय़ात मुंबई आहे का? मुंबईच्या वैभवाचा लवलेशही मला कुठे दिसला नाही. उघडी गटारे, रस्त्यावर सांडपाणी, मच्छरांचा उच्छाद त्यामुळे रोगराई इथे दिसते. जी अवस्था बेहरामपाडय़ाची आहे, ती अवस्था भारतनगरची आहे. काही ठिकाणचे पुनर्वसन प्रकल्प रखडले आहेत. लोकांची घरे तोडून ठेवली आहेत. त्यांना दीड वर्षापासून भाडे मिळत नाही. आता डीसी रुल बदलल्यामुळे पहिल्या बांधकामांना स्थगिती आलेली आहे. त्यांच्यासाठी शिवसेनेने काय केले. मुंबई महापालिकेत शिवसेनेची २२ वर्षे सत्ता आहे. त्यांनी इथल्या लोकांच्या समस्या सोडविल्या नाहीत. शिवसेना-भाजपा हे विकासाच्या मुद्दय़ावर निवडणुका लढवीत नाहीत. तर भावनेच्या प्रश्नांवर निवडणुका लढवितात. जातीजातीत भांडणे लावायची, धर्माधर्मात तेढ निर्माण करायची आणि आपले राजकारण कारायचे हे यांचे काम. केवळ भावनेचा विषय करून तुमचा विकास होणार नाही.

मी इथे केवळ विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवीत आहे. मी विकासाला महत्त्व देतो. २५ वर्षापूर्वी मी कोकणात गेलो. तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातील सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु तिथल्या लोकांनी मला निवडून दिले. मी त्यांच्या विकासाचा चंग बांधला. कोकणात जाऊन पाहा विकास कशाला म्हणतात ते तुम्हाला तिथे दिसेल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी शाळा, इंजिनिअरींग कॉलेज, हॉर्टिकल्चर कॉलेज, रस्ते, पाणी सर्व सुविधा तेथील लोकांना उपलब्ध करून दिल्या. जसे २५ वर्षापूर्वी कोकणचे प्रश्न होते तसेच आता तुमचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू, आक्रमक आमदाराची गरज आहे. तुम्ही मला इथे एकदा संधी द्या. तुमचा आवाज म्हणून विधानसभेत काम करून तुमच्याही जीवनात परिवर्तन घडवून दाखवितो.’’ असा विश्वास नारायण राणे यांनी येथील जनतेला दिला तेव्हा टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला.

[EPSB]

काँग्रेस के लिए पाताल से नारायण आये हैं

‘‘ओ कहते हैं दिल्ली मैं नरेंद्र है, महाराष्ट्र मैं देवेंद्र हैं लेकिन मैं कहता हूँ.. अब रुख जाईए यहा काँग्रेस के लिए पाताल से नारायण आयें है…


डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिलला सरकारने केले नाही तर काँग्रेस करेल

१४ एप्रिलला स्मारकाचे उद्घाटन केले नाही, तर नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन करील, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला.

[/EPSB]

नारायण राणे यांना विविध राजकीय पक्ष, संघटनांचा जाहीर पाठिंबा

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांना आज पहिल्याच दिवशी विविध राजकीय पक्ष, संघटना आणि संस्थांनी जाहीर समर्थन करून पाठिंबा व्यक्त केला आहे.

बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

वांद्रे पूर्व मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे महासचिव संदीप शिर्के यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये मुकेश मिश्रा, शंकर कदम, उमेश गांवकर, अफजल सय्यद, दीपक कुंभार, विजय पावसकर, विशाल कुळकर, कमलेश शुक्ला, हेमंत रोळेकर, अब्दुल फारुकी, देवदास खांबल, जनार्दन गांवकर, नितीन गांवकर, सुरेश घाडीगांवकर, मनोज गांवकर, किशोर बाईत, समीर धुरी, नंदकिशोर नेमन, दीपेश राणे, विध्येश गवळी, विजय शिंदे यांचा समावेश आहे.

भीमस्मरण प्रतिष्ठान

सरकारी वसाहत येथील भीमस्मरण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनंत रिकिबे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या अनेक कार्यकर्त्यांनी नारायण राणे  यांना पाठिंबा जाहीर केला.

मुंबई सफाई मजदूर संघ

मुंबई सफाई मजदूर संघाचे अध्यक्ष राजेश रिडलान आणि सचिव सुरेश रिडलान यांच्यासहा त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांना पाठिंबा जाहीर केला.

मातंग समाज समन्वय समिती

सिध्दार्थ नगर येथील मागासवर्गीय मातंग समाज समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष आतिष वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली राम कुचेकर, कैलाश बल्लाळ यांनी नारायण राणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

1 COMMENT

  1. मिम ला रोखण्याच guppit MIM MADHYACH AAHE. SARWANSATI RANE SHAHEBANCHA VIJAY MAHTWACHHA. EK ATI TADICHA SAMNA..UTSHUKTA SARWANNA AAHYE. MIM LA ROKJNYACHE TANTR SOPPE AAHE. SANDHI MILALITAR SIDHH KARIN. SENA EKA OOLICHA WAPAR KARUN CHHITRA BADLU SAKTY.SHUBHECHHA RANE SHAHEBANNA.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version