Home महामुंबई कामोठय़ात गोळ्या, औषधांचा खच

कामोठय़ात गोळ्या, औषधांचा खच

0

पनवेल – कामोठय़ात सेक्टर २१ मधील प्लॉट नंबर ३३ मध्ये अज्ञात व्यक्तीने वापरायोग्य नसलेली औषधे बेकायदेशीररित्या  टाकणा-याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. औषधे रस्त्यावर टाकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही औषधे कोणी टाकली याबाबत माहिती प्राप्त झालेली नाही.

कामोठे शहरात मोठय़ा प्रमाणात दवाखाने, रूग्णालये आणि मेडीकल्स आहेत. या ठिकाणी निर्माण होणारा बायो मेडीकल्स वेस्टची विल्हेवाट लावण्यात यावी यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाने मुंबई वेस्ट मॅनेजमेट या संस्थेची नियुक्ती केली आहे. मात्र, कचरा उचलण्यासाठी पैसे लागत असल्याने काही रूग्णालये आणि डॉक्टर आपला बायो मेडिकल वेस्ट साध्या कच-यात टाकतात. मात्र, सिडको व पनवेल महानगरपालिका याबाबत खबरदारी घेतली जात असल्याने मेडीकल वेस्ट मिळेल त्या जागेवर डम्प करण्यात येत आहे. त्याबरोबर औषध विक्रेतेही कुठेही एक्स्पायरी औषधे कुठेही टाकून देत आहेत.

यामध्ये गोळ्या, लिक्वीड, लोशनचा समावेश असून लहान मुलांच्या औषधांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही औषधे मुदत संपल्यामुळे वापरासाठी अयोग्य झाल्याने ती टाकण्यात आली असावी. रंगीबेरंगी पॅकेट पडल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष जात आहे. एकंदरीतच वेगवेगळ्या रसायनांचा समावेश असलेल्या या औषधांचा कामोठे रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असे माहित असताना बेजबाबदारपणे अशा प्रकारे बायो मेडीकल रस्त्यावर टाकल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version