Home महामुंबई बैलबाजारमधील एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही!

बैलबाजारमधील एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही!

1

माजी मंत्री नसीम खान यांची ग्वाही

मुंबई –  विमान पत्तन प्राधिकरणाच्या जागेत राहणा-या एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही. जोपर्यंत येथील सर्व रहिवाशांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत एकही झोपडी तोडू देणार नाही, असा इशाराही नसीम खान यांनी यावेळी दिला. दरम्यान, या वसाहतीतील एकाही नागरिकाला अपात्र ठरविण्यात येऊ नये, अशी मागणी नसीम खान यांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेऊन केली.

कुर्ला पश्चिम भागातील संदेश नगर बैलबाझार येथील विमान पत्तन प्राधिकरणाच्या जागेवर हजारो लोक दोन-तीन पिढय़ांपासून राहात आहेत. आता येथील झोपडय़ा तोडण्यात येणार असून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. परंतु, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात येथील पन्नास टक्केपेक्षा जास्त रहिवाशांना उपजिल्हाधिकारी कार्यालयाने अपात्र ठरविले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून ते हवालदिल झाले आहेत. या विभागाचे आमदार आणि माजी मंत्री नसीम खान यांनी या रहिवाशांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. येथील रहिवाशांनी खान यांच्या भेटीसाठी प्रचंड गर्दी केली होती. रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नसीम खान म्हणाले की, या ठिकाणी दोन-तीन पिढय़ांपासून राहणारे लोक मी पाहतो आहे. त्यांना असे अपात्र ठरविता येणार नाही.

येथील एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही. जोपर्यंत सर्व रहिवाशांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत एकही झोपडी तोडू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आठ दिवसांत अहवाल सादर करा!
संदेशनगर बैलबाजार येथील ५२ लोकांना अपात्र केल्याप्रकरणी नसीम खान यांच्या आग्रहावरून राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या दालनात आज बैठक झाली. अपात्र करण्यात आलेल्या रहिवाशांबाबत येत्या आठ दिवसांत अहवाल मागवून योग्य ती कार्यवाही करावी,असे निर्देश महेता यांनी यावेळी दिले.

1 COMMENT

  1. जो भी करो जल्दी करो ।कांग्रेस ने १० साल से कुछ नही किया है ।वोट के लिए जनता को गुमराह मत करो ।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version